---Advertisement---
Tatkal Ticket Booking : जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वेची तात्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकिटे कशी बुक करायची हे माहित असेल. आयआरसीटीसीने प्रवाशांसाठी ट्रेनची तात्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी एक निश्चित वेळ निश्चित केली आहे.
परंतु,सध्या सोशिअल मीडियावर रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल करण्यात आला असल्याची पोस्ट व्हायरल झाली होती. ज्यामध्ये म्हटले होते की १५ एप्रिल २०२५ पासून तात्काळ तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये बदल केले जात आहेत. यामुळे तिकिटे मिळण्याची शक्यता वाढेल आणि दीर्घ प्रतीक्षेपासून दिलासा मिळेल. असेही म्हटले होते की एजंटना सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत तिकिटे बुक करण्याची परवानगी दिली जाणार नाही, ज्यामुळे सामान्य प्रवाशांना चांगली संधी मिळेल.
सोशल मीडियावर चालू असलेल्या पोस्टला उत्तर म्हणून आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) ने निवेदन जारी जारी केले आहे. स्पष्टीकरण देताना आयआरसीटीसीने म्हटले आहे की, “एसी किंवा नॉन-एसी क्लाससाठी तात्काळ किंवा प्रीमियम तत्काळ बुकिंगच्या वेळेत असा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच, एजंटसाठी निश्चित केलेल्या बुकिंगच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.” असे आयआरसीटीसीने स्पष्ट केले आहे.
तात्काळ तिकीट बुकिंगसाठी योग्य वेळ कोणती ?
सध्याच्या नियमांनुसार, तात्काळ बुकिंग ट्रेनच्या मूळ स्थानकावरून निघण्याच्या एक दिवस आधी उघडते.
– एसी क्लाससाठी (२ए, ३ए, सीसी, ईसी, ३ई): बुकिंग सकाळी १०:०० वाजता सुरू होते
– नॉन-एसी क्लाससाठी (एसएल, एफसी, २एस): बुकिंग सकाळी ११:०० वाजता सुरू होते
म्हणजे जर एखादी ट्रेन १५ एप्रिल रोजी सुटणार असेल तर एसी तत्काळ तिकिटाचे बुकिंग १४ एप्रिल रोजी सकाळी १०:०० वाजता सुरू होईल आणि नॉन-एसी तिकिटाचे बुकिंग सकाळी ११:०० वाजता सुरू होईल.