शिक्षक व पदवीधर निवडणुकीचा बाजार!

तरुण भारत लाईव्ह। गिरीश शेरेकर। 

Graduate Constituencies विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी Amaravati अमरावती व Nashik नाशिक विभागात पदवीधर तर नागपूर Nagpur, कोकण Konkan, औरंगाबाद Aurangabad  विभागात शिक्षक मतदार संघासाठी निवडणुक होऊ घातली आहे. Graduate Constituencies भाजपा BJP , काँग्रेस Congress, राष्ट्रवादी काँग्रेस NCP , उबाठा शिवसेना Shivsena व बाळासाहेबांची शिवसेना या पाच प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने तयार केलेल्या रणनितीला त्या-त्या पक्षातल्या इच्छुकांनी छेद दिल्याने पाचही पक्ष हैराण झाले. त्यातूनच उमेदवारांची पळापळ झाल्याने एखाद्या बाजाराचे स्वरूप या निवडणुकीला आल्याचे पाहायला मिळाले. शिक्षितांच्या मतदार संघाला लाजवणारी ही स्थिती आहे. तारेवरची कसरत करून आता उमेदवार निश्चित झाले असून रणधुमाळी सुरू झाली आहे. Graduate Constituencies प्रत्येक मतदारसंघातले राजकीय चित्र लक्षात घेतले तर निकाल धक्कादायक लागतात की काय अशी शंका व्यक्त व्हायला लागली आहे.
अमरावती पदवीधर मतदार संघामध्ये भाजपाने पूर्वीपासूनच विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील यांना उमेदवार घोषीत केले होते. Graduate Constituencies  पण, काँग्रेसला शेवटपर्यंत आपला उमेदवार ठरविता आला नाही. शेवटी नामुष्की टाळण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेचे बुलढाणा येथील माजी पदाधिकारी धीरज लिंगाडे यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली. Graduate Constituencies या दोघांमध्येच थेट लढत होण्याची शक्यता असून काँग्रेस व भाजपाच्या बंडखोरासह एकूण २३ उमेदवार मैदानात आहे. नाशिक पदवीधर मतदार संघामध्ये तर विचित्रच कारभार झाला. Graduate Constituencies येथे प्रस्थापित एकाही राजकीय पक्षाचा हक्काचा उमेदवार नाही. अपक्षांनाच पाठींबा देण्याची वेळ प्रमुख राजकीय पक्षांवर आली. शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने समर्थन दिले आहे. Graduate Constituencies ज्यांच्यामुळे काँग्रेसचे नाक कापल्या गेले आणि नाशिकची निवडणुक फिरली, त्या डॉ. सुधीर तांबे यांचे सुपुत्र सत्यजित तांबे अपक्ष मैदानात आहे. त्यांना अद्याप भाजपाने पाठींबा दिलेला नाही Graduate Constituencies पण, येत्या दोन-तीन दिवसात पाठींब्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
अप्रत्यक्षपणे भाजपाची इज्जत या मतदार संघात दावावर लागली आहे. अत्यंत चुरशीची ही निवडणुक होणार असून राज्यात सर्वाधिक चर्चेत राहणार आहे. Graduate Constituencies नागपूर शिक्षक मतदार संघातही प्रमुख पक्षांना हक्काचा उमेदवार न देता तडजोड करावी लागली. मागितले नसतानाही मराशिपच्या नागोराव गाणार यांना भाजपाला समर्थन द्यावे लागले. दुसरीकडे काँग्रेसला म्हणजेच मविआला विमाशीचे सुधाकर अडबोले यांना पाठींबा द्यावा लागला. त्यांच्या पाठींब्यावरून काँग्रेसमध्ये एकवाक्यता नव्हती. Graduate Constituencies काँग्रेसचा एक गट अडबोले तर दुसरा शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्या बाजुने होता, हे विशेष. शिवसेनेच्या उमेदवाराने येथे माघार घेतली असून राष्ट्रवादीचा बंडखोर उमेदवार मैदानात कायम असल्याने मविआमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र आहे.
Graduate Constituencies राजेंद्र झाडे यांनीही उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. औरंगाबाद शिक्षक मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे व भाजपाचे किरण पाटील हे दोन्ही उमेदवार त्या-त्या पक्षाचे हक्काचे आहे. काळे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतही विरोध झाल्याने बंडखोरी झाली. भाजपाचाही उमेदवार काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून आलेला आहे. इतर मतदार संघांच्या तलुनेत येथे गुंतागुंत कमी आहे. Graduate Constituencies कोकण शिक्षक मतदार संघात शेकापचे विद्यमान आमदार बाळाराम पाटील मविआ समर्थीत उमेदवार आहे. उबाठा शिवसेनेतून आलेले ज्ञानेश्वर म्हात्रे भाजपा-बाळासाहेबांची शिवसेनेचे उमेदवार आहे. येथे मराशिपच्या उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतली. Graduate Constituencies त्यांची ही माघार म्हात्रेंसाठी जशी फायद्याची आहे, तशीच नागपूरच्या नागो गाणार यांना भाजपाचा पाठींबा मिळवून देण्याला कारणीभूत ठरली आहे.
उमेदवारांची संख्या जास्त असली तरी पाचही मतदार संघांपैकी नागपूर वगळता उर्वरीत चार ठिकाणी थेट लढत होण्याचीच शक्यता आहे. Graduate Constituencies नागपूरात तिरंगी होईल. प्रचंड गोंधळ व जोडतोड असल्याने कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे निकालानंतरच स्पष्ट होईल. भाजपा व मित्र पक्षाला विधान परिषदेतली संख्या वाढवायची असल्याने त्यांनी प्रत्येक मतदार संघात फासे फेकले आहे. काही जण फास्यात अडकले असून काही निवडणुकी दरम्यान फसण्याची शक्यता आहे. तुलनेने मविआचे नियोजन कमी पडले. Graduate Constituencies आता सावरण्याचे प्रयत्न होत असले तरी निकालानंतरच त्याचे परिणाम दिसतील. एकंदरीतच भाजपा व मित्र पक्ष आणि मविआसाठी ही निवडणुक आव्हानात्मक ठरणार आहे. निवडणुकीच्या या बाजारात बाजी कोण मारते हेच आपल्याला पाहायचे आहे.