---Advertisement---

शिक्षण माफियांचा हैदोस! ‘बाळा मला माफ कर…’ म्हणत शिक्षकानं उचललं टोकाचं पाऊल

by team
---Advertisement---

बीडच्या स्वराज नगर भागात एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.  शिक्षकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, फेसबुक पोस्टवर केलेल्या सुसाईड नोटवरून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय अभिमान नागरगोजे असं मयत शिक्षकाच नाव आहे. ते केज तालुक्यातील देवगाव या ठिकाणचा रहिवासी आहे. ते केळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक होते २०१९ मध्ये राज्य सरकारकडून २० टक्के अनुदान घोषित करण्यात आलं होतं. मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करत असताना धनंजय यांना अनेक अडचणी आल्या.

आज सकाळी धनंजय यांनी केज येथे स्वराज्य नगर भागात असलेल्या कृष्ण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रांगणात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण काय हे समजू शकले नाही. मात्र जनमानसात होत असलेल्या चर्चेनुसार या व्यक्तीने अनेकांचे नाव घेऊन एक फेसबुक पोस्ट केल्याचे देखील पुढे येत आहे. पोलिसांनी मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे . धनंजय यांनी आत्महत्या केल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

धनंजय नागरगोजे यांची फेसबुक पोस्ट

श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही. बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्नं बघितली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले, काय करू? माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाह. कधी मी कुणाला दोन रुपयांनाही फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतलं नाही.

श्रावणी बाळा, शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ, कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे. तुला अजून काही कळत नाही, तुझं वय आहेच किती, तीन वर्षे… तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही. बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही. सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे. विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्र्वर रजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हालहाल करुन मारणार आहेत.

मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की, मी तुमच्या शाळे गेली १८ वर्षे झालं काम करतोय अजून मला पगार नाही, आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बप्पा म्हणले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे एकूण माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली.

श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो. काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही. बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment