---Advertisement---

Pathardi : बारावीची परीक्षा कडेकोट बंदोबस्तात; बाहेरून कॉपी न देता आल्याने शिक्षकाला चाकूचा धाक

by team
---Advertisement---

पाथर्डी: महसूल, पोलिस आणि पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे यंदा बारावीचा पहिला पेपर संपूर्णतः कॉपीमुक्त पार पडला. या कठोर उपाययोजनांमुळे अनेक वर्षांनी प्रथमच अशा प्रकारे परीक्षा पार पडल्याने बाहेरगावाहून केवळ कॉपीच्या भरोशावर आलेल्या विद्यार्थ्यांची मोठी निराशा झाली. काही विद्यार्थ्यांच्या समर्थकांनी रोष व्यक्त करत केंद्राबाहेर गोंधळ घातला. तिसगाव येथे एका तरुणाने शिक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच दुसऱ्या शिक्षकाला चाकूचा धाक दाखवून दहशत माजवली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

१२ केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त

तालुक्यात एकूण १२ परीक्षा केंद्रे असून, हमखास पास करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी बाहेरगावाहून प्रवेश घेतला आहे. मात्र, यंदा शिक्षण विभागाने कठोर पावले उचलत शिक्षकांच्या नियुक्तीत बदल केला. एका विद्यालयातील शिक्षकांना दुसऱ्या विद्यालयात ड्युटी दिली गेली. महसूल विभागानेही शिक्षकांच्या मोबाईलवर थेट लिंक पाठवत वर्गात सुरू असलेल्या परिस्थितीवर देखरेख ठेवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट वर्गातील स्थिती पाहता येत होती. यंदा तब्बल १२५ पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राबाहेरील संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात आले.

हेही वाचा : धक्कादायक ! बारावी परीक्षेचा ताण सहन न झाल्याने विद्यार्थ्याची परीक्षा केंद्रावरून उडी

ड्रोन आणि सीसीटीव्हीचा प्रभाव

यावर्षी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर करून परीक्षा केंद्रांवर देखरेख करण्यात आली. ड्रोन उडताच केंद्राबाहेर कॉपी पुरवण्यासाठी थांबलेले तरुण पळून जात होते. त्याचबरोबर प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याने परीक्षेदरम्यान कोणत्याही गैरप्रकाराला थारा मिळाला नाही.

हेही वाचा :कर्जाच्या हप्त्याने जुळले सूत ! नवऱ्याला सोडून विवाहितेने थाटला बँक कर्मचाऱ्यासोबत संसार

तिसगावमध्ये शिक्षकाला धमकी, गुन्हा दाखल

कॉपी न करता आल्याने काही तरुण संतप्त झाले. तिसगावमध्ये  तरुणाने केंद्रसंचालक हेमंत नागरे व सुनील शेटे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय, शिक्षक सचिन ढाकणे यांना एका तरुणाने वर्गाबाहेर उभा राहून चाकूचा धाक दाखवला. या प्रकारानंतर संतप्त शिक्षक अनिल भवर, श्री तिलोक संस्थेचे सचिव सतीश गुगळे आणि अन्य अधिकारी पोलिस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment