शिक्षक मतदार संघात जळगाव जिल्ह्यात ११ वाजेपर्यत केवळ २० टक्के मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची मतदान प्रक्रिया सकाळी ७ वाजेपासून जिल्ह्यतील २०केंद्रावर सुरु झाले आहे. यात सकाळी ११ वाजेपर्यंत केवळ २० टक्केच मतदान झाले आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाकरिता जळगाव जिल्ह्यात २० मतदान केंद्र आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत २० टक्के मतदान झाले आहे.कंसात सकाळी ११ वाजेपर्यंत झालेले मतदान यात तहसिल ऑफिस चोपडा (२१.५६,), तहसिल ऑफिस यावल (१८.८९), नवीन तहसिल ऑफिस रावेर (१३.६६), तहसिल ऑफिस मुक्ताईनगर (१२.९०), तहसिल ऑफिस बोदवड (१३.३३), डी. एस. हायस्कुल भुसावळ (२८.२७), डी. एस. हायस्कुल भुसावळ(२७.५२), आर. आर.विद्यालय जळगाव( २४.६६), आर. आर. जळगाव( २२.२६) , भाऊसाहेब काशिनाथ लाठी विद्यामंदिर जळगाव(१७.२६) , तहसिल ऑफिस धरणगाव(२२.८९), तहसिल ऑफिस अमळनेर(१६.३३), राज सारथी मिटिंग हॉल तहसिल ऑफिस अमळनेर(१९.६८), तहसिल ऑफिस पारोळा(१८.९६), तहसिल ऑफिस एरंडोल(२६.६०), तहसिल ऑफिस भडगाव(१९.१२), नानासाहेब वाय. एन. चव्हाण कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय चाळीसगाव(२४.३२), नानासाहेब वाय. एन. चव्हाण कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय चाळीसगाव(२०.४३), तहसील ऑफिस पाचोरा(१७.११), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकी रोड जामनेर(१६.०९) या केंद्रांचा समावेश आहे.