Teachers Constituency Election : अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

जळगाव : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बुधवार 26 जून रोजी मतदान होत आहे.  यात जळगाव जिल्ह्यात 20 मतदान केद्र आहे. या मतदान केंद्रांकडे अधिकारी, कर्मचारी निवडणूक साहित्यासह मंगळावार २५ रोजी रवाना झालेत.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात 1, यावल तालुक्यात 1, रावेर तालुक्यात 1, मुक्ताईनगर तालुक्यात 1, बोदवड तालुक्यात 1, भुसावळ तालुक्यात 2, जळगाव तालुक्यात 3, धरणगाव तालुक्यात 1, अमळनेर तालुक्यात 2, पारोळा तालुक्यात 1, एरंडोल तालुक्यात 1, भडगाव तालुक्यात 1, चाळीसगाव तालुक्यात 2, पाचोरा तालुक्यात 1, जामनेर तालुक्यात 1 असे एकूण 20 मतदान केद्र आहे.

जिल्ह्यात 13 हजार 122 शिक्षक मतदार असून त्यात 9 हजार 673 पुरुष तर 3 हजार 449 स्त्री मतदार आहे. मतदानासाठी 120 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  प्रत्येक केंद्रासाठी  केंद्राध्यक्ष, कर्मचारी, सुक्ष्म निरीक्षक, एक शिपाई, तसेच बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले असून आज कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर पोहोचले आहे.

या निवडणूकीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे यांनी केले आहे