यावल : तालुक्यातील हरिपूर वनक्षेत्रात सागवान लाकडांच्या पाट्या लपवून ठेवलेल्या होत्या. त्या यावल वन विभागाच्या फिरत्या पथकाने जप्त केल्या आहेत.
यावलच्या वन विभागाच्या फिरत्या पथकास गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर उप वनसंरक्षक जमीर शेख पश्चीम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. हरिपुरा व रोपवन संरक्षण मजुरांसह शासकीय वाहनाने मौजे हरिपूरा ते वड्री रस्त्याने गस्त करीत होते. यावेळी पथकाला बेवारस साग चौपट नग लपवलेले दिसून आले. साग चौपट नग ०५ घ.मी. ०.०८२ अंदाजे मालाची किमत रु. १६६० /- जप्त करून शासकीय वाहनाने मु.वि. केंद्र यावल येथे पावतीने जमा केले.
कारवाई पश्चीम वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे व वनरक्षक हरिपूरा अशरफ तडवी, वनरक्षक सुधीर पटणे, वनरक्षक अक्षय रोकडे व वाहन चालक शरद पाटील यांनी केली. पुढील तपास अशरफ तडवी वनपाल हरीपुरा (अतिरिक्त कार्यभार) हे करीत आहे.