T20 World Cup 2026 : टीम इंडियाची घोषणा; जाणून घ्या ‘कोण आऊट कोण इन’

---Advertisement---

 

T20 World Cup 2026 : २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत, १५ खेळाडूंची नावे निश्चित करण्यात आली.

यात जितेश शर्मासह शुभमन गिलला वगळण्यात आले, तर अक्षर पटेलला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेषतः रिंकू सिंगसह इशान किशनला संघात स्थान मिळाले आहे.

रिंकू सिंग टी२० आशिया कपसाठी टीम इंडियाच्या संघाचा भाग होता, परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून त्याला वगळण्यात आले.

यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्मालाही टी२० विश्वचषक २०२६ च्या संघातून वगळण्यात आले आहे. जितेश शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी टीमचा भाग होता.

जसप्रीत बुमराह २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करेल. वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव फिरकीची जबाबदारी सांभाळतील. याशिवाय, हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांची टीम इंडियामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

टी२० विश्वचषक २०२६ साठी टीम इंडिया

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, अक्षर पटेल (उपकर्णधार), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, रिंकू सिंग

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---