8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाच्या लागू होण्यासंबंधित काही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहे. यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सध्याच्या सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे, आणि त्यानंतर आठव्या वेतन आयोगाच्या लागू होण्याची अपेक्षा होती. सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी दोन सदस्यीय पॅनेल व अध्यक्षाची नियुक्ती लवकरच होईल अशी घोषणा केली होती. तथापि, केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये त्यासंदर्भातील कोणताही स्पष्ट उल्लेख वा तरतूद करण्यात आलेली नाही.
हेही वाचा : अनैतिक संबंधातून हत्याकांड, 35 वर्षीय सीमाला 29 वर्षीय प्रियकर राहुलने संपवलं
2025-26 च्या अर्थसंकल्पात 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर कोणताही खर्च न दिसल्यामुळे, सरकारला याबाबत किमान एक वर्षांची तयारी लागेल, अशी माहिती समोर येत आहे. अर्थ मंत्रालयाने सुरक्षा, गृह, आणि कार्मिक विभागांकडून सूचना मागविल्या आहेत, ज्यावर आधारित आयोगाच्या शिफारशीची अंतिम रूपरेषा तयार केली जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये वेतन आणि पेन्शन सुधारणासंदर्भात एक रोडमॅप जाहीर करावा अशी अपेक्षा होती, परंतु त्यात या बाबींचा समावेश न करता 8 व्या वेतन आयोगासाठी अपेक्षित निधी पुढील वर्षी असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा : दारूच्या नशेत पत्नीची वेगळीच मागणी, नकार दिल्याने पतीला दिला बेदम चोप!
इतिहास पाहता, 7व्या वेतन आयोगाचे काम 18 महिन्यांहून अधिक कालावधीमध्ये अंतिम झाले होते. त्यामुळे 8व्या वेतन आयोगाचे रिपोर्ट तयार करण्यास किमान एक वर्ष लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जर असं झाल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.