---Advertisement---
---Advertisement---
नंदुरबारः सातपुड्याच्या कुशीत वसलेले आणि ‘नंदनवन’ म्हणून प्रसिद्ध असलेले तीनसमाळ सध्या पर्यटकांच्या गर्दीने गजबजून लागले आहे. तीन राज्यांच्या सीमेवर असलेले हे निसर्गरम्य गाव. पर्यटक येथे विशेषकरुन रविवारच्या सुट्टीनिमित्त वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. समुद्र सपाटीपासून तब्बल ८४८ मीटर उंचीवर असलेल्या तोरणमाळ येथून महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांची सीमा स्पष्ट दिसते. यामुळे येथील थ्री-स्टेट व्हा पॉईंट केंद्र बनले आहे.
उंचच उंच डोंगर, त्यांना वेढलेली धुक्याची चादर आणि समोर पसरलेली अथांग नर्मदा नदीचे विहंगम दृश्य पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. पावसाळ्यातील आल्हाहदायक वातावरण आणि निसर्गाची मुक्त उधळण अनुभवण्यासाठी या तीनही राज्यांतून मोठ्या होत आहेत. तीमासमाळच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे आणि शांत वातावरणामुळे शहरी जीवनातील धावपळीतून विसावा घेण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण बनले आहे. येथील हिरवीगार वनराई, विविध प्रकारची फुले आणि पक्षांचा किलबिलाट पर्यटकांना एक अविस्मरणीय अनुभव देत आहे.
तीनसमाळ येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असले तरी वन विभाग आणि पर्यटन विभागाने पर्यटनाच्या दृष्टीने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. सुविधा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास तीनसमाळ अधिकमोठ्या प्रमाणावर पर्यटकांना आकर्षित करु शकेल. पर्यटनाचा विकास झाल्यास स्थानिक आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. तीनसमाळ हे केवळ एक पर्यटनस्थळ नसून ते सातपुड्याच्या समृद्ध जैवविविधतेचे आणि नैसर्गिक वैभवाचे प्रतीक आहे.