---Advertisement---

काळजी घ्या! गुढीपाडव्यापासून पाच दिवस तापमान ४२ अंशावर; प्रशासनाने वर्तवला अलर्ट

by team
---Advertisement---

जळगाव : गेल्या आठवड्यात राज्यभरात निर्माण झालेली ढगाळ वातावरणाची स्थिती आता निवळली असून गेल्या चार दिवसांपासून पहाटेच्या वेळी निर्माण झालेला गारवाही कमी होणार आहे. ३९ ते ४० अंशांच्या दरम्यान असलेल्या तापमानात सरासरी दोन ते तीन अंशांनी वाढ होऊन तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर पोहोचण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तवली आहे.

रविवार अर्थात गुढीपाडव्यापासून पुढील पाच ते सहा दिवस तापमान ४३ अंशांवर पोहचू शकेल, असा अंदाजही हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. दरम्यान, तापमान वाढीमुळे रब्बी हंगामातील गहू व कांदा काढणीला वेग येणार आहे. आगामी काळात अवकाळी पावसाची शक्यता कमीच असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

सध्या ३८ ते ३९ अंशावर पारा स्थिर

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भुसावळसह विभागातील सर्वच तालुक्यांमध्ये तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आगामी काळात मुख्यतः निरभ्र आकाश राहून कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक राहू शकेल.
सध्या दिवसाचे कमाल तापमान ३७ ते ३९ अंश तर किमान तापमान हे १९-२१ डिग्री दरम्यान जाणवत आहे. ही दोन्हीही तापमाने सरासरी इतक्याच श्रेणीत आहे.

अवकाळीचे संकट आता धुसर

२४ मार्चपासूनच राज्यातील अवकाळी पावसाचे वातावरण निवळले आहे. त्यामुळे रब्बी पीक काढणी दरम्यानचा अवकाळी पावसापासूनचा नुकसानणीचा धोका टळू शकतो. गत आठवड्यात तीन ते चार दिवस एकाकी झालेल्या दिवसाच्या कमाल तापमान वाढीतून उष्णतेमुळे कांदा गहू सारख्या रब्बी पिकावर विपरित परिणाम जाणवला परंतु काही अंशी ढगाळ वातावरणामुळे २-३ डिग्रीने कमाल तापमान घसरले होते. कमाल व किमान तापमानामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

प्रशासनाने वर्तवला अलर्ट

जिल्हाभरात मार्चच्या अखेरीस उष्णतेच्या लाटेचा अलर्ट प्रशासनाने वर्तवला आहे. यासंदर्भात बैठक घेऊन उपाययोजनाही केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर व विभागातही विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. भुसावळ शहरात साधारण एक एप्रिलपासून तापमान सलग ४० अंशांवर राहते. यंदाही हाच ट्रेंड राहू शकेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment