पुण्यातील हिंजेवाडी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका टेम्पो ट्रॅव्हलला अचानक भीषण आग लागली. या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
हिंजेवाडी परिसरातील फेज वन मध्ये टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग लागली होती. या भीषण आगीमध्ये चार कर्मचारांचा होरपळून मृत्यू झाला आहेर. प्राथमिक माहितीनुसार व्योमो ग्राफिक्स कंपनीतील हे कर्मचारी होते. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली.
अचानक लागलेल्या या आगीमुळे चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. अचानक लागलेल्या या आगीची माहिती मिळताच परिसरात एकच खडबळ उडाली. आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
या अपघातातील जखमींना तातडीने दवाखान्यात पाठविण्यात आले आहे. दुर्घटेनची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे. आगीच्या घटनेनंतर ट्रॅव्हल जळून खाक झाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा गांभीर्याने तपास केला जात आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून या घटेनची नोंद करण्यात आली आहे.
दुर्दैवी ! हिंजेवाडीत टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक; चार जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी
by team
Published On: March 19, 2025 10:36 am

---Advertisement---