---Advertisement---
पाकिस्तानमधील क्रिप्टोकरन्सी वॉलेटमध्ये १० कोटी रुपये हस्तांतरित करण्यासाठी सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीला मदत केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुजरातच्या सुरतमधील एका रहिवाशाला अटक केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सायबर गुन्हयातील पैशांची हेराफेरी करण्यासाठी घोटाळेबाजांकडून वापरल्या जाणाऱ्या बनावट बँक खात्यांबाबत सुरू असलेल्या चौकशीचा एख भाग म्हणून चेतन गंगानीला ताब्यात घेण्यात आले आहे.
दुसन्यऱ्यांच्या नावावर असलेल्या जवळपास ९०० खात्यांचा वापर करून दुबई येथील सायबर गुन्हेगारांना २०० कोटी रुपये पाठवल्याच्या आरोपाखाली ३ नोव्हेंबर रोजी मोरबी, सुरेंद्रनगर, सुरत आणि अमरेली जिल्ह्यातून अटक केलेल्या सहा जणांशी आरोपीचे संबंध होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गंगानीने अटक केलेल्या सायबर टोळीतील सदस्यांना १० कोटी रुपये क्रिप्टोकरन्सी यूएसडीटी किंवा टेधरमध्ये रूपांतरित करण्यास आणि नंतर ते त्याच्या बिटगेट क्रिप्टो वॉलेटद्वारे पाकिस्तानातील वॉलेटमध्ये पाठवण्यास मदत केली होती, असे पोलिसांनी निवेदनात म्हटले. त्याला प्रत्येक यूएसडीटीवर ०.१० टक्के कमिशन मिळाले. त्याला मिळालेल्या एकूण कमिशनबाबतची माहिती पोलिसांनी जाहीर केलेली नाही. चार महिन्यांत









