टेंडर कोकोनट आईस्क्रीम रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । २५ मे २०२३। उन्हाळा,पावसाळा, हिवाळा कोणत्याही सीझनमध्ये आईस्क्रीमला नाही म्हणणे होतच नाही. तुम्ही कधी  टेंडर कोकोनट म्हणजेच खोबऱ्याच्या फ्लेव्हरचे आईस्क्रीम ट्राय केले आहे का?  टेंडर कोकोनट आईस्क्रीम घरी बनवायला सुद्धा खूप सोप्प आहे.  टेंडर कोकोनट आईस्क्रीम घरी कसे बनवले जातात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
फ्रेश नारळाची मलाई, फ्रेश क्रीम, मिल्क पावडर, व्हॅनिला एक्सट्रॅक्ट, नारळाचं दूध, पिठीसाखर.

कृती 
सर्वप्रथम, नारळाची मलाई आणि नारळाचं दूध मिक्सर मधून वाटून घ्या. यात पाणी घालू नका. मग एका ब्लेंडरमध्ये मिल्क पावडर, पिठीसाखर, व्हॅनिला एक्क्सट्रॅक्टचे काही थेंब आणि आपण मलाई व दुधाची वाटलेली पेस्ट घाला यात फ्रेश क्रीम सुद्धा टाका आणि मग एकदा छान मिक्सरला लावून घ्या. एक डब्बा घ्या यात तयार आईस्क्रीम ओतून छान सेट करून घ्या व यामध्ये ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे घाला. साधारण ८ ते १० तास हे आईस्क्रीम सेट होऊ द्या.