---Advertisement---
Jalgaon News: आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये अशा भावना व्यक्त करीत ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जळगावात आक्रमक भूमिका घेत महापालिकेजवळ आंदोलन केले. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी देखिल केली.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आशिया कप स्पर्धेतील भारत-पाक सामन्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. पहलगाम हल्ल्यातील शहीदांचा हा अपमान असल्याचे सांगत राज्यभरात ठाकरे गटाकडून ‘माझं कुंकू, माझा देश’ अशी हाक देत आंदोलन छेडले आहे. जळगावात देखिल शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या प्रमुख मनीषा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर आक्रमक आंदोलन करीत भारत-पाक सामन्याचा निषेध व्यक्त केला. तसेच यावेळी केंद्र सरकारविरूध्द घोषणाबाजी देखिल करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाच्या जया तिवारी, विजया पाटील, रूपा चौधरी, निता लोंखडे, मनिषा सोनवणे, छाया बागुल, कोकिला नाथ, सुनिता नाथ, सरला वानखेडे, छायाताई, उषा पारधी, सुलोचना भोई यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.