‘हमारा बजाज’ हे शब्द किंव्हा धून काही वर्षांपूर्वी घराघरात ऐकू यायची सत्तरच्या दशकात बजाजची स्कुटर असणं हे अति प्रतिष्ठेचं लक्षण होतं. बजाज कंपनीच्या प्रगतीत फिरोदियांचाही मोठं वाटा होता. कालांतराने बजाज कंपनीतून ‘फिरोदिया’ परिवार बाहेर पडला. आणि कनिष्ठ मध्यम वर्गीय आणि मध्यम वर्गीय पुन्हा एकदा स्वःताच्या हक्काच्या गाडीवर स्वार होऊ लागले. कारण नवीन काही तरी शोधून नवा व्यवसाय प्रस्थापित करण्यात फिरोदियांचा हातखंडा होता. स्कुटरच्या तुलनेत काहीशी अशक्त दिसणारी लुना त्यांनी बाजारात आणली किमतीत स्वस्त एव्हरेजला मस्त. घरातल्या नवऱ्याला बजाजची स्कुटर बायका पोरांकडे ‘कायनेटीकची’ लुना. मोजक्या पैश्यात सुखी संसार करण्याचा काळात स्कुटर आणि लुना घरघरात शिरकाव करू लागली. लुना दणगट आणि पळायला वेगवान हे सिद्ध करण्यासाठी कंपनीने त्या काळात पुणे मुंबई धावणाऱ्या डेक्कन क्वीनशी स्पर्धा लावली होती. नवदच्या दशकात आर्थिक उदारीकरण झाल्यानंतर मार्केट मध्ये प्रचंड बदल झाले फटाफट कर्ज मिळू लागले. तत्कालीन स्पर्धेत कायनेटिक मागे पडली.
आता पुन्हा एकदा नव्या दमाने लोक प्रिय लुना मार्केट मध्ये येत आहे. तिचा लूकही काहीचा बदलले ला आहे. मध्यम वर्गीयांची प्रेयसी आता बहुदा कनिष्ठ मध्यम वर्गीयांची प्रेयसी ठरेल असा अंदाज आहे. कारण ही नवी लुना आता इलेक्ट्रीवर धावणार आहे.