---Advertisement---

Walmik Karad : वाल्मिक कराड विरोधातील सर्वात मोठा पुरावा, कराड, सुदर्शन अन् प्रतीक घुले एकत्र CCTV फुटेज आलं समोर

by team
---Advertisement---

Walmik Karad: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील  राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. तर इतर सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे.

वाल्मिकवर २  कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणातील नवीन सीसीटीव्ही समोर आला आहे. या सीसीटीव्हीत खंडणी प्रकरणातील सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळत आहेत.

बीडमधील आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडं दोन कोटी रुपयांची खंडणी ज्या दिवशी मागितली गेली, त्यादिवशीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या व्हिडीओत वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे यांसह सर्व आरोपी एकत्र असल्याचे पाहायला मिळत आहे. हे सर्व  केज शहरातील आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयात एकत्र आल्याचं दिसून आलं आहे. पोलिसांच्या तपासात हा अत्यंत महत्वाचा पुरावा आहे.

हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड

विशेष म्हणजे काही पोलीस अधिकारीही त्यांच्यासोबत असल्याचे पाहायला मिळत आहे. या आरोपींनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी अवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती. त्याच संबंधिताचा हा व्हिडीओ समोर येत आहे. या व्हिडीओ पीएसआय पाटीलही दिसत आहेत.

पवनचक्की अधिकारी शिंदे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी मला २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असं त्यांनी या तक्रारीत म्हटलं होतं. त्याच दिवशीचा हा सीसीटीव्ही फुटेज आहे. या फुटेजमध्ये वाल्मिक कराड हा विष्णू चाटेच्या कार्यालयात आल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळं आता तपासाला देखील गती येणार आहे.

हेही वाचा : Sharon Raj murder case : विश्वास ठेवावा तर कुणावर ? प्रेयसीनेच केला घात, अखेर फाशीची शिक्षा

विशेष म्हणजे जेव्हा वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला तेव्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी वाल्मिक कराडच्या वकिलांनी दावा केला होता की, कराडचा खंडणी प्रकरणातही सहभाग नव्हता, त्याच्यावर दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये देखील याचा उल्लेख नसल्याचा दावा त्यांनी केला होता. यापार्श्वभूमीवर समोर आलेल्या या फुटेजमुळं आता बऱ्याच गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment