भाजपाने शिंदे गटाला चारली धूळ, शिंदे गटाला मिळाली झिरो मते

धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या नगरपंचायतीच्या सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने शिंदे गटाला धूळ चारली आहे. यात भाजपने एक हाती विजय मिळवला असून शिंदे गटाला एकही मते मिळाली नाहीय, अर्थात झिरो मते मिळाली आहे.

धुळे जिल्हा नियोजन समितीच्या  निवडणुकीत भाजपाने शिंदे गटाला धूळ चारली आहे. यात भाजपाने एक हाती विजय मिळवत शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. अर्थात शिंदे गटाला झिरो मते मिळाली आहे. त्यामुळे या निकालाची सगळीकडे चर्चा होत आहे.

धुळे जिल्ह्यातील जिल्हा नियोजन   समितीच्या 23 जागांपैकी 22 जागा बिनविरोध झाल्या. एका जागेसाठी दि.19 रोजी मतदान घेण्यात आले होते. यात शिंदखेडा नगरपंचायतीचे 18 सदस्यांपैकी  16 सदस्यांनी मतदान केले. साक्री नगरपंचायतीचे 17 सदस्यांपैकी 12 सदस्यांनी मतदान केले. यात भाजपाचे अनिल वानखेडे यांना 28 मते मिळाले तर शिंदे गटाचे सुमित नांगरे यांना 0 मते मिळाली.

 

विशेष म्हणजे, सुमित नांगरे यांना  सुचक असलेल्या सदस्य यांनी देखील मतदान केले नाही. त्यामुळे या निकालाची सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे.