---Advertisement---

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन नंदुरबार जिल्ह्यात सहा महिन्यांत २७ रुग्णांना मिळाले नवजीवन

---Advertisement---

---Advertisement---

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उभारी देणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचा लाभ आज शेकडो रुग्ण घेत असून, नंदुरबार जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते जून २०२५ या केवळ सहा महिन्यांत २७ रुग्णांना २७ लाख पाच हजारांची मदत मिळाल्याची माहिती मदत कक्षाने दिली.

आधुनिक वैद्यकीय उपचारांची किंमत सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेली असताना, गरीब रुग्णांना जीवदान देणारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना सरकारने समाजातील शेवटच्या घटकाला दिलेली आधाररेषा आहे. योजनेंतर्गत उपचारासाठी दिलेली रक्कम ही केवळ आर्थिक मदत नाही, तर एखाद्याच्या जीवनातील अंध:कार दूर करणारा प्रकाश आहे.

आरोग्यसंपन्न भारतासाठी सामाजिक भान असलेली योजना सामान्यतः वैद्यकीय योजना म्हणजे विमा आधारित सेवा, ज्यात अनेक अटी असतात. मात्र, काही रुग्ण अशा योजनांच्या कक्षेबाहेर राहतात. कधी उत्पन्नाच्या अटीमुळे, कधी वैद्यकीय प्रक्रियेच्या स्वरूपामुळे. अशा गरजू रुग्णांसाठीच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्य करते.

या योजनेच्या वैशिष्ट्यपूर्ण अटी

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.६० लाखांपेक्षा कमी असावे. अर्जदाराने महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बालस्वास्थ्य योजना किंवा धर्मादाय रुग्णालय या योजनांचा लाभ घेतलेला नसावा.

अर्ज करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया

रुग्ण किंवा त्याच्या नातेवाइकांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून, आवश्यक कागदपत्रांसह मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयात ई-मेल किंवा टपालाद्वारे सादर करावा.

आवश्यक कागदपत्रे

रुग्णाचे व कुटुंबाचे आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला (तहसील कार्यालय), रेशन कार्ड, आजारावरील निदान व उपचार खर्चाचे प्रमाणपत्र, रुग्णालयाचे वैद्यकीय अहवाल, अपघातग्रस्त रुग्णांसाठी एमएलसी व एफआयआर प्रत्यारोपणासाठी झेडटीसीसी किंवा शासन मान्यतापत्र.

एफसीआरए मान्यता-आता परदेशातूनही मिळणार आधार !

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मिळालेली एफसीआरए (Foreign Contribution Regulation Act) मान्यता क्रांतिकारी पाऊल आहे. यामुळे आता परदेशातून येणाऱ्या निधीचे कायदेशीररीत्या स्वीकार करता येणार असून, त्या रकमेतून अधिक गुणवत्तापूर्ण सेवा व उपचार उपलब्ध करून देता येणार आहेत.

गरजूंना आवाहन

गरजू नागरिकांनी तत्काळ कागदपत्रांसह अर्ज दाखल करून या योजनेंतर्गत लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी https://cmrf.maharashtra.gov.in संकेतस्थळास भेट द्यावी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील मदत कक्षाशी संपर्क साधावा.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---