सर्वसामान्यांचं बजेट बिघडणार, दैनंदिन वस्तूंमध्ये होणार ३ ते ४ टक्क्यांची वाढ ?

---Advertisement---

 

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात चाललेल्या युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. ऊर्जा पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम होत असून भारतासह अनेक देशांमध्ये इंधनटंचाईची भीती निर्माण झाली आहे. कच्च्या तेलासह नैसर्गिक वायूच्या उपलब्धतेत मोठी घट झाल्याने इंधनदर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक रोखल्यामुळे समुद्री वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी, विविध उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल वेळेवर मिळण्यात अडथळे येत आहेत.

या परिस्थितीचा परिणाम आता भारतातील महागाईवरही जाणवू लागला आहे. वाढत्या खर्चामुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता पुढे येत आहे. विशेषतः एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्या उत्पादनांच्या दरवाढीचा विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत.

माहितीनुसार, वित्त वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत या कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमतीत सुमारे 3 ते 4 टक्क्यांची वाढ करू शकतात. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज या ब्रोकरेज संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांबरोबरच रुपयाचे अवमूल्यन झाल्याने आयात खर्च वाढला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च नियंत्रणात ठेवणे कंपन्यांसाठी कठीण होत आहे.

गेल्या आर्थिक वर्षात उपलब्ध साठ्यामुळे उत्पादनात अडथळे आले नव्हते. मात्र, आता कच्च्या मालाचा साठा कमी होत चालल्याने आणि त्याचबरोबर त्याच्या किमती वाढल्याने कंपन्यांना दरवाढीचा पर्याय स्वीकारावा लागू शकतो. जर हा निर्णय अंमलात आला, तर शाम्पू, खाद्यतेल, बिस्किटांसारख्या दैनंदिन वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. पुढील काळात या परिस्थितीचा बाजारावर नेमका कसा परिणाम होतो, हे लक्षात ठेवावे लागेल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---