THEFT : गुरे चोरणाऱ्यांसह मुद्देमाल पोलिसांनी घेतला ताब्यात

जळगाव :  रावेर तालुक्यातील निंभोरा हद्दीमधून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून म्हशींची चोरी झाली होती. याचा तपास करतांना पोलिसांनी तांत्रिक मदत घेत 11 म्हशींसह सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल, पाच संशयित आरोपी व एकूण दहा गुन्हे उघडकीस आणले अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, निभोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून २४ एप्रिल रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून म्हशी चोरी  संदर्भात गुन्हे दाखल झाले. यात अज्ञात चोचोरट्याने पाच म्हशी चोरुन नेल्याची नोंद करण्यात आली. या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहा पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी जनावरे चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या.  या सूचनानुसार निंभोरा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि हरीदास बोचरे व तपासी अंमलदार पोहेका ज्ञानेश्वर चौधरी, अविनाश पाटील हे गुन्ह्याचा तपास करीत होते.

गुन्ह्यात सपोनि बोचरे यांनी 60 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमे-यांची पडताळणी केली.  अधिक तपास केला असता आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे  उघड झाले. यातील ब-हाणपुर जिल्ह्यातील बोरी येथे राहणारा तुकाराम रुमालसिग  हा यावल तालुक्यातील न्हावी या गावी राहत असल्याची माहिती मिळाली. सपोनि हरिदास बोचरे यांना प्राप्त झाली.त्यांनी लागलीच फैजपुर पो. स्टे. चे सपोनि निलेश वाघ यांना माहीती देवून आरोपी तुकाराम रुमालसिग बारेला याला ताब्यात घेतले.

आरोपी तुकाराम याच्याकडे तपास केले असता इतर आरोपी मध्य प्रदेश राज्यात असल्याची बाब  उघड झाली.  पोलीस अधिक्षक यांच्या आदेशाने सपोनि हरिदास बोचरे, पोहेकॉ जाकीर पिंजारी, पोहेकॉ योगेश चौधरी, पोना सुरेश पवार व पोकों मयुर निकम व रावेर पो. स्टे. चे. पोहेकॉ ईश्वर चव्हाण, पोकों सचिन घुगे असे शोध पथक मध्यप्रदेश राज्यात जावून आरोपी धर्मेंद्र दुरसिंग बारेला, रा.ढेरीया जि. खंडवा, शांताराम बिल्लरसिंह बारेला, रा. हिवरा जि.ब-हाणपुर, सुभाष प्रताप निंगवाल, रा. दहिनाला जि.ब-हाणपुर, मस्तरीराम काशीराम बारेला, रा.न्हावी ता. रावेर यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडुन म्हशी, 2 बोलेरो पिकअप व 2 मोटार सायकल असे एकुण 16 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला.

या गुन्हाच्या अनषंगाने चौकशी केली असता त्यांने निंभोरा पो स्टे येथील व फैजपुर पो स्टे, मुक्ताईनगर पो स्टे, रावेर पो स्टे , सिल्लोड ग्रामीण पो स्टे (जि. छत्रपती संभाजीनगर) व पंधाना पो. स्टे अशा ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. यातील संशयित आरोपी धर्मेंद्र दुरसिंग बारेला, रा. ढेरीया जि. खंडवा यावर विविध कायदे व कलमान्वये 14 गुन्हे मध्यप्रदेश राज्यात दाखल आहेत. तो पंधाना पोलीस स्टेशनचा जि. खंडवा येथील हिस्ट्रीशीटर आहे. मध्यप्रदेश राज्यातील ब-हाणपुर, खंडवा, खरगोन, हरदा या 4 जिल्हातुन तडीपार करण्यात आले आहे.

हि कारवाई ही निंभोरा पोलीस स्टेशन  प्रभारी अधिकारी सपोनि हरीदास बोचरे,  पोउपनि राजेंद्र पाटील, सफौ ज्ञानेश्वर पाटील,  अशरफ शेख,  स्वप्निल पाटील, सुरेश अढायगे, सुरेश पवार, मयुर निकम, किरण जाधव व अमोल वाघ फैजपुर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि निलेश वाघ, सफौ विजय चौधरी, सफौ देविदास सुरदास, राजेश बऱ्हाटे, महेंद्र महाजन, रावेर पो स्टे पोहेकॉ ईश्वर चव्हाण, सचिन घुगे, स्था. गु. शाखा जळगाव पोना/ईश्वर पाटील, मिलींद जाधव, गौरव पाटील या तांत्रिक विश्लेषण पथकाने सीसीटीव्ही फुटेज व इतर पुरावे गोळा करुन एकुण 10 गुन्हे उघडकीस आणले आहे.