जळगाव : हिंदु जनजागृती समितिच्या वतीने जळगाव येथे २५ डिसेंबर या दिवशी शिवतीर्थ मैदानावर सायंकाळी ५ वाजता जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार विविध माध्यमांतून जोमाने चालू असून या सभेची जळगाव वासीयांची प्रतिक्षा आज संपणार आहे. २५ डिसेंबर या दिवशी दिवसभर सभेचे मैदान सज्ज होण्यास प्रारंभ झाला आहे. सभा स्थळाकडे जाणार्या रस्त्याच्या दुतर्फा श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराचे श्याम कोगटा यांनी स्वयंस्फूर्तीने चित्रा चौक ते शिवतीर्थ मैदान भगवे कापड लावले असल्याने सभास्थळाकडे जाणारा संपूर्ण मार्ग भगवामय झाला आहे.
शहराच्या विविध प्रभागांतून धर्माभिमानी ढोल, ताशांच्या गजरात सभास्थळी पोचण्याचे नियोजन करतांना दिसत आहेत. सभेच्या पूर्वतयारीचे अवलोकन करण्यासाठी जळगावचे भाजपचे आमदार सुरेश भोळे, आमदार तसेच जळगाव जिल्हा दूध संघाचे नवनियुक्त चेअरमन मंगेश चव्हाण यांनी भेट देत मैदानाची पाहणी केली. तसेच जास्तीत जास्त हिंदूंनी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.