अग्रलेख
Election Results भूतकाळात जमा होणा-या वर्तमानकाळातील प्रत्येक दिवसास मावळताना एकच अपेक्षा असते. ती म्हणजे, भविष्यकाळात जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्याच्या कोणत्या तरी पानावर आपली वेगळी ओळख दाखविणारी एक तरी नोंद झालेली असावी! Election Results अर्थात, प्रत्येक दिवसाच्या भाळी इतिहासात नोंद होण्याचे भाग्य असते असे नाही. काही दिवसांची नोंद इतिहासातील काळा दिवस म्हणून होते, तर काही दिवस भविष्यातील इतिहास उजळणारे ठरतात. भारतीय जनता पार्टीच्या मोदी पर्वाचा इतिहास जेव्हा भविष्यकाळात लिहिला जाईल, तेव्हा २०२२ मधल्या डिसेंबरातील ८ तारखेची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी झालेली दिसेल. Election Results खरे तर, भारतीय राजकारणाच्या इतिहासातील २०१४ पासून आजपर्यंतच्या आणि भविष्याच्या पानांवरही मोदी सरकारच्या कर्तबगार कारकीर्दीचा सुवर्णलेप असणारच आहे.
प्रत्येक नव्या दिवसागणीक त्यावर नव्या कर्तबगारीचा सोनेरी लेप चढत असल्याने मोदी पर्व हाच संपूर्ण सुवर्णांकित इतिहास ठरणार आहे. Election Results राजकारणातील विरोधी पक्षांना हे उघडपणे मान्य करण्यात काही मर्यादा असतात असे मानले, तरी मोदी पर्वास आव्हान देणारा आणि नव्या इतिहासाची नोंद करण्याची क्षमता असलेला नेता या घडीस कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही, हे मात्र अप्रत्यक्षपणे प्रत्येक नेत्यास आणि विरोधी पक्षास मान्य करावे लागते. भाजपच्या राज्य कारभारास आणि मोदी यांच्या तेजस्वी कारकीर्दीस पर्याय नाही, याची ही एक प्रकारची कबुलीच आहे. Election Results त्यामुळेच निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा जेव्हा या पक्षांना मतदारच त्यांची जागा दाखवून देणारा आरसा दाखवितात, तेव्हा तेव्हा पळवाटा शोधण्यासाठी पळापळ करण्यापलीकडे काहीच उपाय त्यांच्या हाती नसतो. Election Results ही स्थिती सुदृढ लोकशाहीसाठी केविलवाणी आहे हे खरे असले, तरी विरोधी पक्षांची ही अवस्था कशामुळे झाली याचा विचार करता, त्यांनी स्वत:वरच ही वेळ ओढवून घेतली आहे, हेच उत्तर सापडते.
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी पुन्हा एकदा याचा स्पष्ट पुरावा दिला आहे. Election Results दिल्ली महानगरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील आम आदमी पार्टीच्या जेमतेम विजयाने हुरळून गेलेल्या विरोधकांना लगेचच पुढच्या एकाच दिवसानंतरच्या भविष्याची उज्ज्वल स्वप्ने पडू लागली होती, पण वास्तवाचे भान असलेली माध्यमे, विशेषतः वृत्तवाहिन्या आदी दृक्श्राव्य माध्यमे त्यास बळी पडली नाहीत, ही बहुधा राजकीय वृत्तसृष्टीतील पहिल्यांदाच घडलेली सकारात्मक गोष्ट म्हणावी लागेल.Election Results गुजरातच्या निवडणुकीत मतदारांचा कल आणि कौल ओळखणे माध्यमांना फारसे अवघड जाणार नाही हे अपेक्षित असतानाही, काहींनी मात्र आम आदमी पार्टीच्या गुजरातेतील शिरकावाची गंभीर दखल घेण्याचे धाडस करून पाहिले होते. आम आदमी पार्टी ही गुजरातमध्ये मोदी-शाह यांच्या राजकारणास शह देणारी डोकेदुखी ठरू शकते, असा सूर लावण्याचा प्रयत्नही काहींनी करूनदेखील पाहिला होता.
Election Results पण जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली, तसतसा हा सूर मवाळ होत गेला आणि नंतर बासनात गुंडाळून नाईलाजाने का होईना जनमानसाच्या वास्तवाचा आरसा समाजासमोर धरणे या माध्यमांना भाग पडले. गुजरात ही भाजपची भूमी आहे, हे ताज्या निवडणूक निकालांनी निर्विवादपणे दाखवून दिले आहेच; पण आता ज्या पक्षांना तेथे मतदारांनी पुरते झिडकारून लावले त्यांना आपल्या अस्तित्वाचे सार्वत्रिक आत्मपरीक्षण करणे भाग पडणार आहे. Election Results देशात सातत्याने काही दशके सत्ता उपभोगणाèया आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा राजकीय-सामाजिक इतिहास असलेल्या काँग्रेसवर आलेली नामशेष होण्याची वेळ या निकालांनी अधिक स्पष्ट केली आहे आणि आम आदमी पार्टीची रेवडीची राजनीती सामान्य मतदारास सतत सर्वत्र मान्य होणारी नाही, हेही स्पष्ट झाले आहे.
माध्यमांची निवडणूकपूर्व विश्लेषणांची जी एक पठडीबाज पद्धत असते, त्यामध्ये अगोदरच्या निवडणुकांच्या निकालांचा कल ही महत्त्वाची बाब असते. Election Results साधारणपणे मतदार हा सातत्याने कोणा एका पक्षास भरभरून मत देत नाही, हा बèयाचशा दृक्श्राव्य माध्यमांनी स्वत:शी निश्चित केलेला एक पठडीबाज पूर्वनिकष असतो आणि त्याला ओपिनियन पोल qकवा एक्झिट पोल म्हणून त्या पठडीत बसविण्याचा प्रयत्न केला जातो, हे एव्हाना मतदारांच्याही ध्यानी येऊ लागले आहे. Election Results कदाचित यामुळेच प्रत्यक्ष कल आणि राजकीय भूमिका यांच्यातील संघर्षात मतदारांच्या भावनांना डावलून धोरणानुसार ठरलेला कल माथी मारणे आता अशा माध्यमांना अवघड होऊ लागले आहे. Election Results त्यामुळेच गुजरात निवडणुकांच्या रणधुमाळीत अनेक वृत्तवाहिन्यांनी व्यावसायिक राजकीय विश्लेषक व्यक्ती-संस्थांच्या मदतीने तयार केलेल्या ओपिनियन पोल qकवा एक्झिट पोल सर्वेक्षणांचे निकाल वास्तविकतेशी विसंगती दाखवूच शकले नाहीत. Election Results तरीही, गुजरातमधील भाजपच्या महाविक्रमी मताधिक्याचा अंदाज वर्तविण्यात हात आखडता घेतल्याने अंदाज वर्तविण्यातही ही माध्यमे कमीच पडली, असे निकालावरून म्हणावे लागेल.
आजवर सलग सात वेळा सत्तेवर येणा-या भाजपने गुरुवार, ८ डिसेंबर २०२२ या दिवशी, गुजरातेत नव्या सत्तापर्वासाठीचा महाविक्रमी विजय नोंदविला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या विजयी उमेदवारांकरिता एका बसमधील आसने पुरतील एवढ्याच जागा मिळाल्या होत्या, असे गमतीने म्हटले गेले होते. Election Results गुजरातेतील ताज्या विधानसभा निवडणूक निकालानंतर, तेथे विजयी झालेल्या विरोधी पक्षांच्या उमेदवारांकरिता मिनी बसदेखील पुरेशी होईल, असे आता गमतीने म्हटले जाईल. यातील विनोदाचा भाग बाजूला ठेवला, तरी विरोधकांनी मतदारांचा विश्वास गमावला आहे, ही बाब गांभीर्यानेच घ्यावी लागेल. Election Results एव्हाना गुजरातेतील भाजपच्या विजयाची अंतिम आणि अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली असेल. गुजरातेत भाजप हा एकमेव पक्ष निवडणुका qजकू शकतो आणि हा पक्षच तेथील जनतेचे प्रतिनिधित्व करणारा विश्वासार्ह राजकीय पक्ष आहे, हे पुन्हा सिद्ध झाले.
एखाद्या राज्यातील विधानसभा निवडणूक ही भावी सार्वत्रिक निवडणुकांची चुणूक असते. गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारच्या कारकीर्दीच्या दुसèया पर्वात देशाची प्रतिष्ठा ज्या नव्या झळाळीने जगाच्या पाठीवर उजळून निघाली आहे, त्याचे प्रतिqबब निवडणुकांतील जनादेशातून उमटले आहे. Election Results येत्या वर्षभरात जी-२० परिषदेच्या यजमानपदाच्या निमित्ताने भारताचे तेजस्वी दर्शन जगाला घडविण्याची अभूतपूर्व संधी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारतास प्राप्त झाली आहे. या संधीचे सोने करावयाचे असेल आणि भारताने जगाचे नेतृत्व करावे ही पंतप्रधानांची इच्छा पूर्ण करावयाची असेल, तर त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, हा स्पष्ट संदेश गुजरातच्या मतदारांनी निकालाच्या कौलातून संपूर्ण देशास दिला आहे. Election Results
गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेशातील विधानसभेच्या निकालांनीही मतदारांच्या प्रगल्भतेचे संयत स्वरूप स्पष्ट केले आहे. मतदारास गृहीत धरणे आणि जनतेस संभ्रमित करण्याचे राजकारण करणे कोणाही राजकीय पक्षास कधीच जमणार नाही, याची जाणीव हिमाचल प्रदेशातील निकालांनी भाजपसह सर्वच पक्षांना करून दिली आहे. हिमाचल प्रदेशाच्या जनतेने निवडणुकांची स्वघोषित नीती आखलेली आहे. Election Results आजवर कोणत्याच एका पक्षास येथील मतदारांनी दुसèयांदा सत्ता बहाल केलेली नाही. सत्तास्थानाचा खांदापालट करून प्रत्येक पक्षाच्या कर्तबगारीस वारंवार जोखण्याचा या राज्याचा इतिहास अनोखा म्हणावा लागेल. या निवडणुकीत या राज्याने भाजपला विरोधी बाकांवर बसण्याचा आदेश दिला आणि काँग्रेसला सत्तास्थापनेची संधी दिली. असे असले, तरी काँग्रेसवर विश्वासाचा वर्षाव केला असेही नाहीच आणि काँग्रेसला पर्यायच नाही अशा फुशारक्या मारण्याची संधी मिळू नये याची दक्षताही या मतदारांनी घेतली आहे. Election Results पुढची पाच वर्षे सत्ता मिळणे ही संपत चाललेल्या काँग्रेसच्या जिवंतपणाची धुगधुगी ठरणार आहेच; पण पक्षांतर्गत संघटनात्मक नेतृत्वाच्या मुद्यांवरून सुरू झालेला सैरभैरपणा संपवून पर्यायी नेतृत्व निर्माण करण्याकरिता गंभीर होण्याचा इशाराही हिमाचलातून काँग्रेसला मिळाला आहे.
या दोन्ही राज्यांतील निवडणुकांपासून काँग्रेसने राहुल गांधी यांना जाणीवपूर्वक लांब ठेवले. मोदी यांच्या नेतृत्वाच्या तेजापुढे राहुल गांधी फिके पडले तर नेतृत्वाच्या पर्यायाचे पितळच उघडे पडेल, याची जाणीव हेच त्यामागचे कारण असले, तरी भारत जोडोसारख्या उदात्त हेतूचा मुलामा देऊन राहुल गांधींच्या नेतृत्वक्षमतेच्या मर्यादांची मूठ झाकून ठेवण्याचाच तो प्रयत्न होता, हे आता लपविता येणार नाही असे सत्य आहे. Election Results गुजरात विधानसभेच्या निकालातून आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, असा जोरदार दावा त्या पक्षाचे मनीष सिसोदिया यांनी बुधवारच्या दिल्ली निवडणूक निकालांनंतर केला होता. जनता म्हणजे मतदार सुज्ञ असतो आणि राजकीय पक्षांच्या तालावर तो नाचत नसतो, हे या निकालांनी दाखवून दिले. गुजरातेतील मतदारांनी आम आदमी पार्टीचा मुखभंग केला, तर हिमाचल प्रदेशांना भाजपला भानावर राहण्याचा सल्ला दिला. Election Results काँग्रेससारख्या पक्षास उथळपणा सोडून गांभीर्याने राजकारण करण्याचा धडा शिकविला, तर मतदारास गृहीत धरू नका, हा सार्वत्रिक सल्ला सर्वच पक्षांना दिला गेला.
Election Results आता निकालांनंतर विजयाचे श्रेय भाजपमध्ये साहजिकच मोदी-शाह आणि पक्षाच्या निवडणूक नीतीसोबत जनतेच्या पक्षावरील विश्वासास बहाल केले जाईल. काँग्रेसमध्ये मात्र पराजयाच्या श्रेयाचे वाटेकरी ठरविताना मोठी वैचारिक कसरत करावी लागेल. राहुल गांधी यांना निवडणुकांपासून लांब राखण्याची धोरणी खेळी अगोदरच करून काँग्रेसने त्या खापर फोडण्याच्या स्पर्धेतून त्यांना बाजूला ठेवले आहे. Election Results त्यामुळे पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष आता पराजयाची जबाबदारी आणि प्रायश्चित्त घेऊन पक्षाला कोणती नवी दिशा देतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कारण लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांनी आपला आब राखला पाहिजे, त्यासाठी मतदारांना विरोधी पक्षांचाही विश्वास वाटेल, असे सकारात्मक राजकारण विरोधी पक्षांनीही केले पाहिजे. केवळ गुजरातेतच नव्हे, तर संपूर्ण देशातील भाजपेतर पक्षांना हा संदेश निकालांनी दिला आहे. Election Results महाराष्ट्रानेही त्यापासून बोध घ्यावा, असे मराठी माणसास वाटत असेल तर ते गैर नाही.