तरुण भारत लाईव्ह न्यूज । जळगाव येथील रेल्वे स्टेशनच्या पार्सल ऑफिस जवळील पुलाच्या खाली ६० वर्षीय अनोळखी वृद्ध बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी डॉक्टरांनी वृद्धाची तपासणी केली असता त्यास मृत घोषित केले. दरम्यान, त्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शवागृहात हलविण्यात आले असून वृद्धाची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव रेल्वे स्टेशनच्या पार्सल ऑफिस जवळील पुलाच्या खाली रविवार दि. ३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता अंदाजे ६० वर्षीय अनोळखी वृद्ध बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यास १०८ रुग्णवाहिकेवरील कार्यरत डॉ. मोहसीन शेख यांनी तपासून मृत घोषित केले. या मयत वृद्धांचे वर्णन पुढील प्रमाणे केस पांढरे, रंगाने सावळा, शरीर बांधा सडपातळ , उंची ५ बाय ७ ,अंगात फिकट निळ्या रंगाचे लायनिंगचे फुल बाहीचे शर्ट, निळ्या रंगाची फुल पॅन्ट, फिकट निळ्या रंगाचे अंडर पॅन्ट परिधान केलेली आहे. त्याची ओळख पटली नसून व त्यांचे मृतदेह ओळख पटवण्याकामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे राखून ठेवण्यात आले आहे. पुढील तपास पो. हवालदार सचिन कुमार जगदीश भावसार हे करीत आहेत. तरी सदर मयत यांची ओळख पटली नसून व त्यांचे प्रेत ओळख पटवणे कामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे राखून ठेवले आहे.