---Advertisement---

जुन्या भांडणाचा वाद ; तरुणास चाकूने केले जखमी ; चौघांविरोधात गुन्हा दाखल

by team
---Advertisement---

भुसावळ : जुन्या भांडणाच्या वादातून एका तरूणाला शिवीगाळ करून चाकूने वार करत जखमी केले. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील खडका गावात रविवार, ११ रोजी रात्री १०.३० वाजता घडली होती. याप्रकरणी मंगळवार, १३ ऑगस्ट रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडका येथे तेजबहाद्दुरसिंह सुरेंद्रसिंग पाटील हा तरूण आपल्या परिवारासह राहतो.  रविवारी ११ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास तो त्यांच्या घराच्या समोर बसलेला होता. यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून तुषार वासुदेव भोळे, दर्शन दत्तात्रय भोळे, भुषण बेंडाळे, अनुराग नांदेळकर सर्व रा. खडका ता.भुसावळ यांनी त्यास शिवीगाळ करत मारहाण केली. यातील एकाने चाकूने त्यांच्यावर हल्ला करत गंभीर जखमी केले.

याप्रकरणी तेजबहाद्दुरसिंह याचे वडील सुरेंद्रसिंग पाटील यांनी भुसावळ तालुका पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार श्याम कुमार मोरे करीत आहे

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment