माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

जळगाव :  शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी जिल्ह्यातील प्रमुख 13 संघटनांच्या माध्यमातून बैठक घेण्यात येऊन माध्यमिक क्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती दोन वर्षासाठी समन्वयक तथा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतपेढीचे संचालक तुळशीराम सोनवणे यांनी जाहीर केली.

या नवीन कार्यकारणी  अध्यक्ष : नारायण वाघ (जळगाव), कार्याध्यक्ष : गोविंदा पाटील (बोदवड) , उपाध्यक्ष : पी बी नरवाडे (बोदवड) , गिरीश एस नेमाडे (भुसावळ),आर. एस. पाटील (जळगाव) , प्रभाकर बोरसे (वरणगाव) , देवेंद्र तायडे (भुसावळ),  सचिव– एस. एस. अहिरे (भुसावळ), सहसचिव : आर. के. पाटील (जळगाव), कृष्णराव विसावे (पारोळा) . खजिनदार– सुनील वानखेडे (भुसावळ) , प्रसिद्धीप्रमुख– प्रवीण धनगर (जळगाव) , संजय पाटील (भडगाव) , दिनेश पाटील (जामनेर) , महिला प्रतिनिधी– श्रीमती सुनिता पाटील (जळगाव) , सौ सुनीता खडके (जळगाव) , कार्यकारिणी सदस्य संतोष कचरे (जळगाव) , विनोद महेश्री (सावदा) , रवींद्र अडकमोल (बामनोद) , विकास चौधरी (मुक्ताईनगर) , किरण पाटील (चोपडा) , आर जे पाटील (अमळनेर) , किरण कुमार मगर (चाळीसगाव), विनोद पाटील(पारोळा), गजानन कंखरे (पाचोरा), करणकुमार सुरडकर (जामनेर) , अमोल वाणी (एरंडोल) , बि डी शिरसाट (धरणगाव),प्रदीप हिरोळे (बोदवड) , चंद्रकांत देशमुख (रावेर) , संदीप मनोरे (भडगाव) यांची निवड करण्यात आली आहे.
समन्वय समितीने समिती स्थापना होत असतानाच्या काळातच शिक्षक शिक्षकेतरांच्या थकीत बिलांच्या संदर्भात वस्तुस्थिती जाणून घेऊन शिक्षणाधिकारी व वेतन अधीक्षक पथकाच्या माध्यमातून हा प्रश्न तडीस नेला. तसेच अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेत पगार होणे या प्रश्नासाठी म.जिल्हाधिकारी जळगाव यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुद्धा प्राधान्याने सोडविला.

समन्वय समितीच्या स्थापनेत शैलेंद्र खडके यांचे सुद्धा मोलाचे योगदान असल्याने व ही संघटना स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याने कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांची एकमताने निवड करण्यात आली. तन-मन धनाने समन्वय समितीस सहकार्य करण्याचे आश्वासन खडके यांनी दिले. समितीचे ज्येष्ठ सल्लागार म्हणून प्र ह दलाल, पी. एस.सोनवणे, शुद्धोधन सोनवणे, डॉ. मिलिंद बागुल, डॉ. संजू भटकर, समाधान महाजन, किशोर राजे, आर. डी. बोरसे, पी. ए .पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.

समन्वय समितीतील सहभागी संघटना

शिक्षक भारती, राज्य शिक्षक परिषद, शिक्षक सेना, बहुजन शिक्षक शिक्षकेतर संसद, विज्ञान अध्यापक मंडळ, इस्तू संघटना ,जळगाव जिल्हा खाजगी शाळा शिक्षकेतर संघटना, शिक्षकेतर सेना ,भाजपा शिक्षक आघाडी, राष्ट्रवादी शिक्षक सेल, पदवीधर डीएड कला क्रीडा शिक्षक संघ, महाराष्ट्र कलाध्यापक संघ, शिक्षक व प्रशिक्षक संघ, माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीचे शैक्षणिक वर्तुळातून स्वागत करण्यात येत आहे.

जिल्ह्यात प्रथमच प्रमुख अशा 13 संघटनांच्या माध्यमातून समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधवांचे वेळोवेळी निर्माण होणारे प्रश्न, शिक्षण क्षेत्रात वेळोवेळी होणारे बदल, पालक शिक्षक विद्यार्थी यांचा समन्वय अशा विविध पातळ्यांवर शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणून शिक्षकांना न्याय व हक्क मिळवून देण्या साठी समन्वय समिती सतत प्रयत्नशील राहणार आहे.

तुळशीराम सोनवणे,

समन्वयक तथा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी संचालक जळगाव