तलावात उतरलेल्या आठ मुलांचा मृत्यू, पहा काय आहे घटना!

 तरुण भारत :  पावसाळा सुरु झाला आहे. आणि अपघाताच्या घटना देखील वाढत आहे. रायबरेलीतील गावाच्या काठावर असलेल्या छोट्या तलावात पाच मुलांचा एकत्र बुडून मृत्यू झाला. मुलांचा आरडाओरडा ऐकून गावकऱ्यांनी तीन मुलांना वाचवले, मात्र पाच मुलांचा मृत्यू झाला. अपघातात कोणाच्या घरातील एक तर दोन मुलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना रडताना पाहून तेथे उपस्थित लोकांचे डोळे भरून आले. यावेळी काहीजण शेतात गेले होते, तर काही बन्सी रिहायक ग्रामसभेच्या मांगता येथील डेरा गावात भात लावणीत व्यस्त होते. मुले घरी होती,

8 मुलांनी आंघोळीसाठी गावाच्या काठावर असलेल्या छोट्या तलावात उडी घेतली. तलाव खोल असल्याने सर्वजण बुडू लागले. मुलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेतात काम करणारे लोक धावले, मात्र तोपर्यंत पाच मुले बुडाली होती. गावकऱ्यांनी कसेबसे तिन्ही मुलांना वाचवले. माहिती मिळताच उपजिल्हा दंडाधिकारी आसाराम वर्मा, स्थानिक पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. दीड वाजता पोलीस अधीक्षक गावात पोहोचले आणि कुटुंबीयांकडून घटनेची माहिती घेतल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.पावसाळा सुरु असले तो पर्यंत नागरिकांनी तलावात पोहणे टाळावे. व लहान मुलांची काळजी घेयावी.