---Advertisement---
छपरा : मोठ्या भावाने लहान भावाचा चाकूने वार करीत खून केल्याची घटना घडली आहे. मयताचे नावं सोनू कुमार (वय १७ ) असे आहे. या घटनेनंतर मोठा भाऊ सनी हा फरार झाला आहे. एका क्षुल्लक कारणांवरुन हा खुनाचा प्रकार घडला आहे.
या खून प्रकरणांत खुनाचे कारण समोर आले आहे. सोनुने एक आईस्क्रीम स्वतः खाल्ले व एक आईस्क्रीम आईला दिले, तसेच त्याच्या मोठ्या भाऊ सनीच्या पत्नीसाठी देखील आईस्क्रीम आणले होते असे बोलले जात आहे. वाहिनीला आईस्क्रीम दिल्यानंतर वाद उफाळून आला होता. असे बोलले जात आहे की, सोनुने सनीच्या पत्नीला आईस्क्रीम दिले तेव्हा तिने गैरअर्थ काढला. यानंतरच दोघां भावांमध्ये वादास सुरुवात झाली. हा वाद वाढतच गेला.
या वादात सनीचा राग अनावर झाला व त्याने लहान भावांवर चाकूने हल्ला चढविला. हा चाकूचा घाव सोनूच्या चाकू सोनूच्या छातीच्या डाव्या बाजूला लागला, ज्यामुळे तो रक्तस्त्राव करत होता. रक्ताळलेल्या अवस्थेत त्याच्या कुटुंबीय त्याला उपचारासाठी सामुदायिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. आरोग्य केंद्रांतील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर प्राथमिक स्वरूपाचे उपचार करुन त्याला पीएमसीएचला घेऊन जाण्यास सांगितले.
---Advertisement---
मात्र, एमसीएचला नेत असतांना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. पोलिसांनी याची खबर मिळताच ते घटनास्थळी तात्कळ दाखल झालेत. त्यांनी कुटुंबांतील सदस्यांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. यावेळी त्याच्या आईने सांगितले की, सोनू त्याच्या चार भावांमध्ये तिसरा होता. तो घरात एकुलता एक कमावता मुलगा होता. त्याच वेळी, कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की सनीचे लग्न पाच दिवसांपूर्वी झाले होते. सुनीलने त्याच्या वाहिनीला आईस्क्रीम खायला दिले, त्यामुळे वाद वाढला.