---Advertisement---
मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नामनिर्देश पत्र स्विकारण्याचा कालावधी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर, ३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाणनी, तर १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.
‘या’ महापालिकांमध्ये होणार निवडणूक
निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार, मुंबई MMRDA विभागामध्ये मुंबई, नवी मुंबई,
ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, पनवेल.
पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सांगली,
सोलापूर, इचलकरंजी,
उत्तर महाराष्ट्र विभागामध्ये नाशिक, अहिल्यानगर,
धुळे, जळगाव, मालेगाव.
मराठवाडा विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर,
लातूर, नांदेड-वाघाडा,
परभणी, जालना.
विदर्भ विभागामध्ये नागपूर, अकोला, अमरावती,
चंद्रपूर.
दरम्यान, नामनिर्देश पत्र स्विकारण्याचा कालावधी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर, ३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाणनी, तर १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.









