कट्टर समाजवादी नेत्याची एक्झिट !

तरुण भारत लाईव्ह । विजय कुळकर्णी ।

Sharad Yadav समाजवादाचे कट्टर समर्थक, मागास व सामान्यांचा आवाज म्हणून बिहारच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे जनता दल युनायटेडचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद यादव Sharad Yadav यांचे गुरुवार, १२ जानेवारी रोजी उपचारादरम्यान निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. यादव यांचा जन्म १ जुलै १९४७ रोजी मध्यप्रदेशातील बाबई, जिल्हा होशंगाबाद येथे झाला होता. Sharad Yadav जबलपूर अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी बी. टेक. केले होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मागासलेल्या व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या राजकीय पदांचा वापर केला. १९७४ मध्ये मध्यप्रदेशातील जबलपूर लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले. Sharad Yadav १९७७ मध्ये त्याच मतदारसंघातून ते पुन्हा खासदार झाले. १९७९ मध्ये जनता पार्टी फुटली तेव्हा ते चरणसिंह यांच्या गटात गेले होते. Sharad Yadav त्यानंतर त्यांनी बिहारमधील मधेपुरा लोकसभा मतदारसंघातून चारदा लोकसभेत प्रतिनिधित्व केले.
दोन वेळ मध्यप्रदेशातील जबलपूर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले, तर एकदा उत्तरप्रदेशातील बदायूं लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले. Sharad Yadav अशाप्रकारे मध्यप्रदेश, बिहार आणि उत्तरप्रदेश या तीन राज्यांतून खासदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. हे देशातील कोणत्याही राजकीय नेत्याला आजपर्यंत जमलेले नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ते संयोजक होते. मात्र, त्यांच्या पक्षाने रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. Sharad Yadav राजकीय डावपेच आणि युती, आघाडीचे राजकारण, नेत्यांना आपल्याकडे वळविण्याच्या राजकारणात ते तरबेज समजले जात. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांना गुरू मानतात. त्यांनी एका लोकसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांचादेखील पराभव केला होता. Sharad Yadav देशाच्या राजकारणातील ते एक ज्येष्ठ नेते होते. इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, राजीव गांधी इत्यादी राजकीय नेत्यांसोबत त्यांनी काम केले.
Indira Gandhi इंदिरा गांधींशी त्यांचे नेहमीच राजकीय मतभेद राहिले. मात्र, अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून चांगली कामगिरी केली होती. Sharad Yadav आणिबाणीमध्ये त्यांनी तुरुंगवासदेखील भोगला. राजकारण करताना त्यांनी आपली इभ्रत कायम ठेवली. राजकारणात नेत्यांची इभ्रत जायला वेळ लागत नाही. पण, त्यांनी आपल्या स्वाभिमान, मानसन्मानाला ठेच लागेल, असे कृत्य कधीच केले नाही. त्यांच्यावर तसे कोणतेच आरोपदेखील कधीच झाले नाहीत. यावरून त्यांच्या स्वच्छ चारित्र्याची जाणीव होते. भारतीय राज्यघटनेविषयी त्यांना नितांत आदर होता. Sharad Yadav आमचे संविधान जिवंत माणसाचे श्रद्धास्थान आहे, संविधानानुसारच देश चालला पाहिजे, आपल्या देशाची राज्यघटना हे एकमेव जिवंत पुस्तक असून, त्यात प्रत्येक नागरिकाचे अधिकार सुरक्षित आहेत, असे ते म्हणत.
त्यांच्या आईच्या निधनानंतर यादव भावंडांमध्ये जमिनीची वाटणी झाली. Sharad Yadav प्रत्येकाच्या हिश्श्यावर चार-चार एकर जमीन आली. त्यांच्या हिश्श्याची जमीन त्यांनी आईच्या नावाने दान करण्याचा निर्णय घेतला. एका खाजगी संस्थेवर ही जबाबदारी सोपवून त्या जमिनीवर आई सुमित्रा यादव यांच्या नावाने शाळा सुरू केली. गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी ही शाळा सुरू केली. पिपरिया रोड येथे सुमित्रा पब्लिक स्कूल ही शाळा आजही सुरू आहे. Sharad Yadav ते जेव्हा जेव्हा त्यांच्या गावी जायचे, तेव्हा त्या शाळेविषयी विचारणा करायचे. शाळेत त्यांचे आडनाव अहिर असे नोंदविण्यात आले होते. ते आठवीत असताना त्या नावावर हजेरी देत नसत. त्यांना हे नाव पसंत नव्हते. त्यांनी त्या नावावर हजेरी दिली नाही म्हणून शिक्षकांनी त्यांना मारले. त्याचा त्यांच्या बालमनावर खोलवर परिणाम झाला. Sharad Yadav तेव्हाच त्यांनी सामाजिक आणि आर्थिक असमानतेची दरी मिटविण्याच्या दिशेने विचार सुरू केले. स्वातंत्र्य संग्राम सेनानीच्या परिवारातील असल्याने त्यांना राजकारणाची आवड होतीच. Sharad Yadav अभियांत्रिकीची पदवी घेतल्यावर त्यांची नोकरीसाठी निवडदेखील झाली होती. पण, त्यांनी सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्धार केला.
Sharad Yadav ते डॉ. राममनोहर लोहियांच्या विचारांनी प्रभावित होते. त्यांनी अनेक आंदोलनांत भाग घेतला. १९६७, १९७२ तसेच १९७५ मध्ये आणिबाणीत त्यांनी तुरुंगवास भोगला. जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत ते संघर्ष करीत राहिले. समाजावर त्यांची अविचल निष्ठा, ही त्यांची सर्वांत मोठी उपलब्धी होती. मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यासाठी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्याकडे सातत्याने आग्रह धरला होता. Sharad Yadav लालूप्रसाद यादव व नितीश कुमार या दोन नेत्यांच्या जीवनातच नव्हे तर त्यांच्या सत्ताकाळात ते प्रदीर्घ काळ केंद्रीय स्थानी होते. लालूप्रसाद यादव यांना मुख्यमंत्री करण्यात त्यांचे मोठे योगदान होते, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. Sharad Yadav बिहारमध्ये जेव्हा समाजवादी नेत्यांमध्ये दोन गट पडले तेव्हा ते जॉर्ज फर्नांडिस व नितीश कुमार यांच्या गटात सहभागी झाले. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत ते लालूप्रसाद यादव यांच्या विरोधात मैदानात उतरले. Sharad Yadav एवढेच नव्हे तर त्यांनी त्यांचा पराभव केला. २००५ मध्ये नितीश कुमारांना बिहारच्या सत्तेच्या खुर्चीवर बसविण्यात त्यांचे विशेष योगदान होते.