नागपूर । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नागपुरात येथे संध्याकाळी ४ वाजता होईल. विशेष म्हणजे तब्बल ३३ वर्षांनी नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी होत असल्यामुळे सध्या नागपुरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलीय. त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. यावेळी कोणाकोणाला मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे याबाबत अद्यापही महायुतीमधील घटक पक्षांकडून यादी जाहीर झाली नाहीय. मात्र भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी आमदारांना फोन करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिपदासाठी आज सकाळपासून संबंधित पक्षाच्या वरिष्ठांनी फोन केले आणि मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगितले. यात भाजपकडून 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः आमदारांना फोन करुन मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगत आहे.
भाजपकडून कोणा कोणाला मंत्रिपदासाठी फोन
नितेश राणे
शिवेंद्रराजे भोसले
चंद्रकांत पाटील
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
जयकुमार गोरे,
अतुल सावे,
माधुरी मिसाळ,
चंद्रशेखर बावनकुळे,
अशोक उईके,
आकाश फुंडकर,
संजय सावकारे
शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपदासाठी फोन-
उदय सांमत
प्रताप सरनाईक
शंभूराज देसाई
योगश कदम
आशिष जैस्वाल
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर
दादा भूसे
गुलाबराव पाटील
संजय राठोड
संजय शिरसाट
राष्ट्रवादीकडून कोणाला मंत्रिपदासाठी फोन-
आदिती तटकरे
बाबासाहेब पाटील
दत्तमामा भरणे
हसन मुश्रीफ
अनिल भाईदास पाटील
नरहरी झिरवाळ