तरुण भारत लाईव्ह । १ जानेवारी २०२३। नवीन वर्ष ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुख संपत्ती आनंद घेऊन येणार आहे. चला तर नेमकं कोणत्या राशींसाठी शुक्र आनंद घेऊन येणार आहे, तरुण भारतच्या माध्यातून जाणून घेऊया.
मेष : शुक्राच्या संक्रमणामुळे तुम्हाला परिवारासोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक दृष्ट्या तुम्ही मजबूत व्हाल. कोर्टात सुरु असलेली जुनी प्रकरणे तुमच्या बाजूने सुटू शकतात. तुम्हाला तुमच्या वडिलांचे सहकार्य मिळेल. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
मिथुन : या राशीबदलामुळे बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या कामांना गती मिळेल. तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील. या काळात तुम्हाला तुमच्या अपेक्षेनुसार यश मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढवणाऱ्या घटना घडतील. मानसन्मान मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या काही घटना घडतील.
वृश्चिक : शुक्राच्या संक्रमणामुळे नोकरीत बदलीची शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला सिद्ध होईल. लांबचे प्रवास घडतील. तुमचा यशाचा मार्ग मोकळा होईल. जवळच्या व्यक्तींचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. आर्थिक क्षेत्रात सुधारणा होईल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
तूळ : राशी परिवर्तनाच्या प्रभावामुळे तुमची आर्थिक बाजू सुधरेल. तूळ राशीच्या लोकांसाठी विशेषत: व्यवसायात हे वर्ष भरपूर लाभदायक ठरेल. मानसिक तणावातून मुक्त होऊन मोकळ्या आकाशात उंच उडण्याचे हे काळ आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्याना पुढील वर्षी यश मिळू शकते. हा काळ तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदात घालवणार आहात.
मीन : नोकरदार लोकांना कठोर परिश्रम करावे लागतील. मुलाच्या बाजूने तुम्हाला आराम मिळेल. तुमचे परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल.नोकरी व्यवसायात गुंतलेल्याना लोकांना प्रगती होईल.जे लोक शिक्षणाशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हा काळ उत्तम असेल.