शेवटच्या क्षणापर्यंत माघारीसाठी राजकीय पक्षांची दमछाक, काहींना रडू कोसळले; ३१७ उमेदवारांची माघार, ३३३ रिंगणात

---Advertisement---

 

Jalgaon News : महापालिकेच्या निवडणुकीसाठी माघारीची अंतीम मुदत शुक्रवारी दुपारी ३ वाजता संपली. शेवटच्या क्षणापर्यंत प्रभागातील इतर उमेदवारांची माघार घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह समर्थकांची चांगलीच दमछाक झाल्याचे पहायला मिळाले. आज ३१७ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असून रिंगणात ३३३ उमेदवार कायम आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. माघारीसाठी अवघा दीड दिवस मिळाल्याने राजकीय पक्षांनी माघारीसाठी रात्र जागून काढली. शुक्रवारी २ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत माघारीची अंतीम मुदत होती. त्यामुळे सकाळी ११ वाजेपासूनच माघारीसाठी महापालिकेत धावपळ सुरू झाली होती.

राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांकडून फोनाफोनी

प्रभागातील उमेदवारांची माघार घेऊन आपला उमेदवार बिनविरोध काढण्यासाठी फोनाफोनी सुरू होती. तसेच काही जण वाहनांमध्ये उमेदवारांना आणून त्यांची माघार करून घेतांना दिसत होते. त्यामुळे महापालिकेच्या आवारात राजकीय पदाधिकाऱ्यांसह समर्थकांची गर्दी होती.

महापालिका परिसराला छावणीचे स्वरूप

माघारीच्या अंतीम दिवशी राजकीय संघर्ष किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. महापालिकेत येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करूनच त्यांना आत प्रवेश दिला जात होता.

स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवाराचा संताप

स्वराज्य शक्ती सेनेचे उमेदवार अमोल चौधरी ह्यांचा अर्ज ते अनुपस्थित असतांना मागे घेतला गेल्याने त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. सूचक आणि अनुमोदक यांना माघार घेण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी प्रशासनावरही गंभीर आरोप केले.

बिनविरोध होताच समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजी

भाजपा आणि शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध झाल्यानंतर समर्थकांकडून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---