जळगाव : श्री गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. या पार्श्वभूमीवर सालाबादप्रमाणे शनिवार , 17 रोजी गायत्री मंदिर विसनजी नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची प्रथम आगमन नियोजनाची प्राथमिक बैठक उत्साहात पार पडली.
यात सुरवातीस विविध मंडळांनी उत्सवासाठीचे केलेले नियोजन यावर चर्चा होऊन शहरातील मंडळांना श्री स्थापना संदर्भात येणाऱ्या अडचणी याबाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने श्री उत्सवादरम्यान शहरातील साफसफाई, श्री दधिची चौक बालाजी पेठ येथील रस्त्यावर तयार केलेल्या नवीन ढापाची उंची अधिक असल्याने तेथून श्रींची मूर्ती मार्गक्रमण करण्यास अडचण निर्माण होईल या प्रमुख समस्यांसह इतर समस्यांवर चर्चा करण्यात आली.
यावर्षी शहरातील अनेक गणेश मंडळांचा मूर्त्या उंच असल्याने व काही भागात नवीन रस्ते तयार होऊन उंची वाढलेली आहे त्यामुळे झाडांची छाटणी करणे, खाली आलेल्या विद्युत तारांची वेळेच्या आत दुरुस्ती करणे, छत्रपती शिवाजी नगर भागातील स्मशानभूमी रस्त्यावर पडलेला मोठा बुजविणे, त्यासोबतच परवानगी घेताना महावितरणतर्फे घेतली जाणारी डिपॉझिटची रक्कम परतावा विषयी येणाऱ्या अडचणी या समस्या मांडण्यात आल्या.
महामंडळाची कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी प्रत्येक मंडळाने प्रत्येकी 2 सदस्य हे महामंडळासोबत द्यावे जेणेकरून संपर्क लवकर होऊन प्रश्न लवकर निकाली लागतील असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने सर्व मंडळांना करण्यात आले.
याप्रसंगी महामंडळाचे जेष्ठ सदस्य दिपक जोशी, समन्वयक सूरज दायमा, किशोर देशमुख, राजू मराठे, अश्विन भोळे, मुनेश बारी, राहुल परकाळे, राकेश तिवारी, दीपक दाभाडे, धनंजय चौधरी, भूषण शिंपी, चेतन पाटील, गोपाल रामावत, अमोल धांडे, सागर चौधरी, पंकज मोमाया, विक्की भोईटे, विनोद अनपट, सुजय चौधरी, साई सराफ,अरुण श्रीखंडे, दिपक श्रीखंडे, विकास चौधरी, नीरज पाटील, विनायक पाटील, दिपक नाझरकर, चेतन नाथजोगी, बापू गवळी, भूषण गवळी, विष्णू गवळी, हृषीकेश पाटील, सुनील पवार, मनोज सपकाळे, अक्षय कोळी, ललित सोनवणे, अश्विन शंकपाळ, धीरज सपकाळे, जितेंद्र सोनवणे, कल्पेश तीलकपुरे, नितीन चौधरी, नितीन सनकत, धीरज पुरोहित, पियुष मंधवाणी, निखिल कटपाल, लवीन शिव, श्रीकांत शिखवाल, मोहित सिखवाल, भरत सैनदाने, मोहित नेमाडे, प्रीतम शिंदे, सागर चौबे, अर्जुन गुजर, विपूल पाटील, मयूर शिंपी, अथर्व ठाकरे, राहुल घोरपडे, चेतन सोनवणे, भूषण सपकाळे, शंतनू सपकाळे, विजय सारस्वत, गौरव क्षीरसागर, जयेश सोनवणे, दीपक सोनवणे, प्रकाश गवळी, अतुल शिरसाळे, आकाश जाधव, पवन शिर्के, आकाश फडे यांच्यासह जळगाव शहरातील विविध श्री गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढील दुसऱ्या नियोजन बैठकीची तारीख व वेळ लवकरच सर्व मंडळांना कळविली जाईल असे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे जाहीर करण्यात आले.