जळगाव : घरात कोणी नसताना १९ वर्षीय तरुणीने छताला गळफास घेत आत्महत्या केली. शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरातील व्यंकटेश नगरात आज रविवार, १५ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. महिमा नंदलाल सनान्से (वय १९, रा. व्यंकटेश नगर, हरिविठल परिसर, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरातील व्यंकटेश नगरात महिमा ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होती तिचे वडील सलून व्यावसायिक आहेत. दरम्यान, रविवारी घरी कोणी नसताना महिमाने छताला गळफास घेत आत्महत्या केली. त्यावेळी तिची आई घरासमोरील दुकानाजवळ बसली होती. थोड्या वेळाने घरात आली असता महिमा छताला गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. यावेळी तिने एकच हंबरडा फोडला.
कुटुंबीयांनी महिमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती महिमाला मयत घोषित केले. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.