---Advertisement---

एक चूक भोवली अन् नवरदेव मुकला सात वर्ष मधुचंद्राच्या रात्रीला !

---Advertisement---

लग्नानंतर आनंदी आयुष्य प्रत्येकाला हवं असतं पण, काही लोकांच्या त्या इच्छा अपूर्ण राहतात. यात कधी पत्नीची तर, कधी पतीची काही कमतरता असते. असाच एक प्रकार समोर आला आलाय, जिथे केवळ एका चुकीमुळे लग्नाच्या सात वर्षानंतरही नवरदेवाला मधुचंद्राच्या रात्रीला मुकावं लागलंय.

सूत्रानुसार, पती रवी आणि पत्नी सौम्या असे या दाम्पत्यांचे नाव आहे. या दाम्पत्यांचे 2017 मध्ये थाटामाटात लग्न झाले होते. मात्र, पती रवी याने पत्नी सौम्याला दिलेला शब्द पूर्ण न केल्यामुळे या दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले. या वादामुळे पती रवी याला तब्बल सात वर्ष मधुचंद्राच्या रात्रीला मुकावं लागलं. त्यानंतर पती रवी याने या त्रासाला कंटाळून न्यायालयात धाव घेत दाद मागितली.

पती रवी याने आपल्या याचिकेत सांगितले की, लग्नानंतर आपल्या स्टेटसनुसार रिसेप्शन न दिल्यामुळे पत्नी सौम्या रागावली, तेव्हापासून तिने पती रवीला आपल्या जवळ येऊ दिले नाही. शिवाय ती बेडरूममध्ये पती रवीवर वारंवार हल्ला करायची.

तसेच 2017 ते 2019 या काळात पत्नी सौम्याने पती रवीला व्हॉट्सॲपवर वारंवार मेसेज करून रिसेप्शन न दिल्यामुळे टोमणेही मारले. हे सर्व मेसेज जवळपास 127 पानांचे होते, जे पती रवी याने आपल्या याचिकेत पुरावा म्हणून  न्यायालयात सादर केले होते.

यापूर्वी हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात सुरू होते, त्यात पती रवीच्या बाजूने निर्णय देऊन 2022 मध्ये घटस्फोट मंजूर करण्यात आला होता, पण त्यानंतर पत्नी सौम्याने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि सांगितले की, तिला पती रवीवर प्रेम आहे.

यानंतर हे संपूर्ण प्रकरण उच्च न्यायालयात चालले. हे सर्व प्रकरण कर्नाटकातून असून, आता उच्च न्यायालयाने या दाम्पत्यांचा घटस्फोट मंजूर केलाय. पती रवीने व्हॉट्सॲप मेसेज आणि इतर गोष्टी उच्च न्यायालयात सांगितल्या. त्यानुसार आता उच्च न्यायालयाने या दाम्पत्यांचा घटस्फोट मंजूर केलाय.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment