लग्नात गोंधळ होणं हे अगदी नेहमीचंच आहे, आणि कधी कधी या गोंधळामुळे लग्नाच्या आठवणी अजून खास बनतात. पण कधी-कधी लग्नात असाही गोंधळ निर्माण होतो सर्वांनाच डोक्याला हात लावावा लागतो. असाच काहीसा प्रकार पुढे घडला आहे त्याबद्दल जाणून घेऊया..
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका लग्नसोहळ्यात मोठा गोंधळ उडाला. संपूर्ण विधी-विधानानुसार विवाह पार पडला. आणि अचानक वधूच्या पहिला पती गेस्ट हाऊसमध्ये आला. यानंतर वरपक्षाला समजले की वधूचे आधीच लग्न झाले आहे. हे ऐकून सर्वानाच धक्का बसला.
कानपूरच्या चकेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गेस्ट हाऊसमध्ये बारात थांबवण्यात आली होती. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी, वधूचा पहिला पती तिथे पोहोचला. त्याला पाहताच वधू आणि तिच्या कुटुंबाला धक्का बसला.
पहिल्या पतीने सांगितले की ३ वर्षांपूर्वी त्यांचे कोर्ट मॅरेज झाले होते, पण काही महिन्यांपूर्वी वादामुळे ते वेगळे झाले होते. त्यानंतर वधूच्या कुटुंबाने तिचे दुसरे लग्न ठरवले.
हेही वाचा : दोन बायका अन् फजित ऐका, असा ठरला तिघांचा फॉर्म्युला!
दुसऱ्या पतीसोबत जाण्यास नकार
वधूचे आधीच लग्न झाले असल्याचे समजताच दुसऱ्या वरपक्षाने मोठा गोंधळ घातला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पहिल्या पतीने पोलिसांना बोलावले. वादानंतर वधूने पहिल्या पतीसोबत लग्न झाल्याची कबुली दिली आणि दुसऱ्या नवऱ्यासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला.
हेही वाचा : Crime News: जालन्याची मोनिका ठरली ‘लव्ह जिहाद’ची बळी; शेतात नेत इरफानने केले असे की, अंगावर येईल काटा
तक्रार दाखल नाही
चकेरी पोलिसांनी सांगितले की, वधूने पहिल्या पतीसह जाण्यास नकार दिला आणि ती आपल्या कुटुंबासोबत घरी निघून गेली. सध्या या प्रकरणात कोणत्याही पक्षाने पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे चकेरी परिसरात दोन नवऱ्यांमध्ये अडकलेल्या वधूची चर्चा रंगली आहे.