---Advertisement---
शरद ऋतूत चंद्र विषुववृत्ताच्या सर्वांत जवळ येतो. यालाच ‘हार्वेस्ट मून’ म्हणतात. सामान्यतः ‘हार्वेस्ट मून’ हा सप्टेंबरमध्ये येतो. परंतु, चंद्राचा भ्रमण कालावधी आणि कालदशिकिमधील फरकामुळे यंदा तो ऑक्टोबरच्या रात्री आकाशात तेजस्वी दिसणार आहे. ही खगोलीय घटना यापूर्वी २०२० मध्ये घडली होती. यानंतर असा चंद्र २०२८ मध्ये दिसेल असं सांगितलं जात होतं परंतु हा ‘हार्वेस्ट मून’ २०२५ च्या ऑक्टोबरमध्ये दिसणार आहे.
यंदाचा हार्वेस्ट मून हा सूपर मून असणार आहे. पौर्णिमला दिसणाऱ्या नेहमीच्या चंद्रापेक्षा हा ६.६ टक्के मोठा आणि १३ टक्के अधिक तेजस्वी दिसणार आहे. ही घटना आकाश निरीक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. यंदा हार्वेस्ट मून भारतीय वेळेनुसार ६ ऑक्टोबरच्या सायंकाळी ५.२७ वाजता देशात दिसेल आणि ७ ऑक्टोबरला सकाळी ९:१६ तेजस्वी स्वरूपात जगातील काही भागांत दिसणार आहे. उत्तर गोलार्धात हा भौगोलिक नजारा अतिशय स्पष्टपणे दिसणार आहे. मात्र, दृश्यमानतेवर हवामानाची परिस्थिती परिणाम करू शकते.
निरभ्र आकाशात चंद्र चांदीप्रमाणे चकाकेल. विविध संस्कृतींमध्ये या पौर्णिमेचे वेगवेगळे महत्त्व आहे.
निसर्गाप्रति मानवाने कृतज्ञता, विपुलता दर्शवण्यासाठी अनेक सण या महिन्यात साजरे केले जातात. या हंगामात कॉर्न म्हणजेच मका पिकवण्यात येतो म्हणूनच याला कॉर्न मून संबोधले जाते.
भारतीयांनाही दिसेल चंद्राचे लोभस तेज
६ ऑक्टोबरला सूर्यास्तानंतर चंद्र उगवल्यावर देशात रात्री आकाशात चंद्राचे लोभस तेज अनुभवता येणार आहे.
सांकृतिक महत्त्व
हार्वेस्ट म्हणजे कापणी आणि मून म्हणजे चंद्र. शरद ऋतूमध्ये येणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला हर्वेस्ट मून म्हणतात. या पौणिमिच्या चंद्रामुळे शेतकऱ्यांना पिके काढण्यासाठी अधिक काळ प्रकाश मिळतो. तीन दशकांपूर्वी शेतकरी या कालावधीत कापणी करीत असत. हिवाळ्यापूर्वी म्हणजेच दिवस लहान होण्यापूर्वी पिके कापणीचे काम पूर्ण होते.
असा पाहा हार्वेस्ट मून
- हा चंद्र कोणत्याही पहाण्यासाठी उपकरणाची गरज नाही विशेष
- कमी प्रदूषण असलेल्या शहरी भागांत ही घटना स्पष्ट दिसेल
- दुर्बिणीच्या सहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागावरील अधिक स्पष्ट दिसेल तपशील
---Advertisement---