---Advertisement---

हिंदू समाजाचा दराराच हवा !

by team
---Advertisement---

दुबईत झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडवर मिळविलेल्या विजयाने भारतात जल्लोष न झाला असता तरच नवल होते. तो होणार होता आणि झाला. देशाच्या अनेक शहरांमध्ये नागरिकांनी रात्री रस्त्यावर येऊन गुलाल उधळला, फटाके फोडले, रॅली काढल्या आणि जल्लोष केला. भारतीय लोकांनी भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक केले. या स्पर्धेत भारत चॅम्पियन ठरल्याचा हा आनंद होता. परंतु, हा आनंद ज्यांच्या डोळ्यात खुपतो, असेही लोक भारतात आहेत, याची प्रचीती देणारा प्रसंग मध्य प्रदेशातील मह येथे घडला. इतर ठिकाणांप्रमाणे तेथेही भारताच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी रॅली निघाली. ती तेथील जामा मशिदीजवळून जात असताना दगडफेक झाली आणि संघर्ष सुरू झाला. या प्रकरणात पंधरा-वीस लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका फिर्यादीने पोलिसांना सांगितल्यानुसार, आज तुमचा निकालच लावतो, असे एका समुदायातील काही लोक म्हणत होते. या संघर्षात अनेकांच्या घरांमध्ये दगड पोहोचले. दुकाने, वाहने जाळली गेली. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात असले तरी या घटनेने काही संकेत दिलेले आहेत, जे समस्त हिंदू समाजाने व्यवस्थित समजून घेतले पाहिजे.

हिंदू समाज सहिष्णू आहेच. त्यासाठी त्या समाजाला कुणीही प्रशिक्षण देण्याची आवश्यकता नाही. तो सहिष्णू नसता तर इतक्या धर्मविशेषांचे लोक भारतीय परंपरेत सामावले गेले नसते. तो सहिष्णू नसता तर इतका प्रगत झाला नसता. काही धर्म-पंथाचे लोक भारतीय संस्कृती आणि परंपरेत असे मिसळून गेले आहेत की, जणू दुधात साखर ते त्यांच्या उपासना पद्धती पाळतात, त्यांच्या चालीरीती पाळतात. पण, भारतीय समाजाच्या मु’य प्रवाहाशी सामंजस्याने वागतात, चांगले संबंध ठेवतात. काही अल्पसं’य समुदाय मात्र अद्याप आपल्या हेकडीवर कायम आहेत. या देशावर अनेक शतके आपल्या पूर्वजांनी राज्य केल्याचा त्यांचा अभिमान आजच्या लोकतांत्रिक व्यवस्थेत वृथा असला तरी ते काही त्यांच्या डोक्यातून जात नाही. त्यामुळेच असे वाकडे वर्तन करण्याची त्यांची हिंमत होते. अशा प्रवृत्तींना नियंत्रित करण्याचे काम कायदा करेलच. परंतु, हिंदूंनी अधिकाधिक संघटित होऊन अशा समुदायांची हिंमत वाढू नये, याची काळजी घेणे ही काळाची गरज बनलेली आहे.

भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देशाला गौरव मिळवून दिला तेव्हा संपूर्ण भारतात आनंदाचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक होते. पण या आनंदोत्सवाच्या वातावरणाला महतील हिंसाचाराने गालबोट लावले. एकीकडे याच मातीतून आमचाही जन्म झालेला आहे, असे म्हणायचे आणि त्याच मातीच्या विजयाच्या आनंदात मिठाचा खडा टाकायचा, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. अलिकडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा विजय क्वचित होतो. पण, एखादवेळ तो झाला तर भारतात तो विजय साजरा करणारी पिलावळ ती हीच. त्यांचे वर्तन हा भारताच्या राष्ट्रीय अस्मितेवरील हल्ला आहे आणि हिंदू समाजासाठी एक इशारा आहे, हे हिंदूंनी समजून घेतले पाहिजे. प्रथमदर्शनी असे दिसते की, महतील हिंसाचार हा भारताच्या विजयाबद्दल दुःखी झालेल्या आणि देशात अस्थिरता निर्माण करू इच्छिणाऱ्या घटकांनी भडकवला. भारतात क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रियता मिळालेला क्रीडा प्रकार आहे. तो आपल्याकडे इंग’ जांकडून आलेला असला तरी क्रिकेट आणि भारत हे समीकरण आता जगभरात मान्यता पावलेले आहे. भारतीय क्रिकेट संघाने जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन विजयी पताका फडकवली आहे. आशियाई स्पर्धा असोत किंवा ऑलिम्पिक असो, भारताचा विजय किंवा भारताला मिळालेली पदके हा समस्त भारतीयांच्या दृष्टीने विजयाचा, गौरवाचा विषय असतो. त्यामुळे त्याचा जल्लोष साजरा करणे अस्वाभाविक नाही. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर जिंकतो तेव्हा ती संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब असते. पण, आपल्याच देशात काही घटक असे आहेत, ज्यांना भारताचा विजय सहन होत नाही. ते आपला द्वेष, नैराश्य, निषेध असे सारे व्यक्त करण्यासाठी दुसरे काहीही करू शकत नाहीत आणि त्यामुळे जल्लोषादरम्यान हिंसा भडकावणे त्यांना आवडते. महमध्ये जे काही घडले, ते याच मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. संपूर्ण देश भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा करीत असताना काही समाजकंटकांनी या प्रसंगाचे रूपांतर हिंसाचारात केले. अशा घटकांचा मुख्य उद्देश हिंदू समाजात दहशत निर्माण करणे आणि त्यांच्या भावना दुखावणे हाच आहे, हेही हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे.

भारताच्या विजयाच्या प्रसंगी हिंसाचार उफाळल्याचा हा पहिला प्रसंग खचीतच नाही. यापूर्वीही काही वेळा अशा घटना घडल्या आहेत. त्यामागे कट्टरपंथीय मानसिकता आहे. त्यांना भारताचा विजय आणि त्याची प्रगती आवडत नाही. त्यांना त्याचे दुःख होत असते. असे समाजकंटक समाजात हिंसाचार, अस्थिरता पसरवून स्वतःचे हित साधू इच्छितात आणि त्याआडून राजकीय डावपेच खेळतात. जगाची एक रीत आहे. अपघात कसाही झाला तरी मोठ्या गाडीची चूक असते. सायकलवाला कसाही चालवू देत, दोष कारचा असतो. कारवाला कितीही मस्ती करू देत, दोष ट्रकचा असतो. त्याचप्रमाणे अनेकदा हिंदूंच्या माथी दोष मारला जातो. त्यांनाच सामंजस्याचे आणि सहिष्णुतेचे धडे दिले जातात. त्यासाठी आजकाल सोशल मीडियासारखे माध्यम फार प्रभावी पद्धतीने वापरले जाते. त्यामागे हिंदू समाजात भीती निर्माण करू पाहणाऱ्या आणि हिंदूंचे ऐक्य कमकुवत करू पाहणाऱ्या काही संघटनाही आहेत. अशा सर्वांना उत्तर द्यायचे असेल आणि त्यांना नियंत्रणात ठेवायचे असेल तर हिंदूंचे व्यापक ऐक्य हाच पर्याय आहे. दुर्दैवाने आजही समस्त हिंदू समाजातील प्रत्येक घटकाला ऐक्याचे महत्त्व पटलेले नाही. अद्याप हिंदू समाज जाती-जातींमध्ये विखुरलेला आहे. हिंदू ही आपली व्यापक ओळख आहे आणि तीच आपले रक्षण करणार आहे, हे सर्वांनी ध्यानात घेतले पाहिजे. त्यासाठी अनेक संघटना प्रयत्न करीत आहेत. इतिहास साक्षी आहे की, जेव्हा जेव्हा हिंदू समाज संघटित झाला, तेव्हा तेव्हा बाह्य आणि अंतर्गत शत्रूचा पराभव झाला. हिंदू समाज एकजूट राहिला तर देशात अस्थिरता पसरवणारे घटक परावृत्त होतील. हिंदू समाजाला आपली संस्कृती आणि धर्म जपावा लागेल, जेणेकरून कोणतीही बाह्य शक्ती ती कमकुवत करू शकणार नाही. त्यासाठी सर्वप्रथम जातीची बंधने झुगारून हिंदू म्हणून सर्वांनी एकमेकांना आपले मानले पाहिजे. हिंदू समाजाने अशा नेत्यांना आणि पक्षांना पाठिंबा दिला पाहिजे, जे राष्ट्रवादी विचारसरणीचा पुरस्कार करतात आणि भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची क्षमता ठेवतात. हिंदू समाज हा देशात बहुसंख्य असला तरी तो पूर्णपणे संघटित नाही. त्यामुळे त्याची ताकद दिसत नाही. नव्या पिढ्यांना हिंदू संस्कृती, धर्म, परंपरांचे महत्त्व समजावून सांगितले तर एक मोठे परिवर्तन घडून येईल. कायद्यावर विश्वास ठेवणे वेगळे आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिद्ध होणे वेगळे. त्यासाठी एकेक हिंदू माणूस हा सक्षम होणे गरजेचे आहे. शांततेचा उपदेश करणारा बलवान असेल तरच तो ऐकला जातो. कमकुवताने कितीही विश्वशांतीचे प्रवचन दिले तरी त्याकडे कुणी लक्ष देत नाही. हिंदू समाज हा विशाल समुदाय आहे. तो सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विचारी आहे. त्याने आपल्या विविध क्षेत्रातील पराक्रमांचे व कर्तृत्वाचे झेंडे साता समुद्रापार रोवलेले आहेत. त्याने आपल्या मायभूमीत पूर्णपणे संघटित व्हावे ही एकच बाब त्याची ताकद आणि क्षमता शतगुणित करेल. तसे झाले तर पुन्हा कधीही मह घडणार नाही. महू येथील हिंसाचाराने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे, की भारताचे यश आणि हिंदू समाजाची ताकद तोडण्यासाठी देशविरोधी शक्ती नेहमीच सकिं य असतात. त्यांना वेळ, प्रसंग यांचे काहीही औचित्य नसते. अशा प्रवृत्तींच्या विरोधात कंबर कसून उभे राहिले पाहिजे. सामाजिक शांततेला नख लावणारे लोक मोजके आहेत, पण माजलेले आहेत. त्यांना वेळोवेळी कायद्याने तर ठेचलेच पाहिजे; शिवाय संघटित हिंदू समाजाचा एवढा दरारा निर्माण व्हावा की अशा समाजकंटकांतील एकाचीही अशा प्रसंगी साधी काडी उचलण्याचीही हिंमत होऊ नये…..

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment