‘द केरळ स्टोरी”नंतर प्रेक्षकांना ‘बस्तर’ची उत्सुकता!

नवी दिल्ली,
लोकप्रिय चित्रपट निर्माता विपुल अमृतलाल शाह आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी ‘द केरळ स्टोरी‘च्या यशानंतर पुन्हा एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ही जोडी आता  ‘बस्तर’ चित्रपट घेऊन येत आहे. निर्मात्यांनी त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा पोस्टरसह केली आहे.  चित्रपटाचे हे घोषणेचे पोस्टर आशादायक दिसत आहे. यासोबतच लोकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

या चित्रपटाविषयी फारसे काही उघड झाले नसले तरी, विपुल अमृतलाल शाहचा आगामी चित्रपट आणखी एक धक्कादायक आणि डोळे उघडणारा असेल, असे म्हटले जाते, जो आणखी एका सत्य घटनेने प्रेरित आहे. ज्यपद्धतींनी ‘द केरळ स्टोरी‘च्या माध्यमातून त्यानी लव्हजिहाद सारख्या गोष्टी समोर आणून समाजासमोर मांडल्या आहेत.

असाच एक चित्रपट लवकरच लवकरच प्रेक्षकांना पहिला मिळणार आहे .

या चित्रपटा मध्ये ‘एक और शक्ती जो देशाला थक्क करेल’ असे लिहिले आहे.  ‘आँखे’, हॉलिडे, फोर्स, कमांडो, ‘वक्त’, ‘नमस्ते लंडन’, ‘सिंग इज किंग’, ‘द केरळ स्टोरी’, सनक, ब्लॉकबस्टर वेब शो ह्युमन आर यांसारख्या चित्रपटांसह विपुल अमृतलाल शाह यांनी त्यांच्या फिल्मोग्राफीसाठी लोकप्रिय केले आहे. इतकंच नाही तर विपुल अमृतलाल शाह हे एक दूरदर्शी व्यक्ती आहेत आणि हे त्यांच्या चित्रपटातही स्पष्टपणे दिसून येतं. बस्तर लास्ट मंक मीडियाच्या सहकार्याने सनशाइन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे विकसित आणि निर्मित केले जात आहे. हा चित्रपट५ एप्रिल २०२४  रोजी प्रदर्शित होणार आहे, या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल जाणून घेण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत.