---Advertisement---

नराधमाने चिमुकलीला घरी बोलवलं अन्…

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २७ ऑगस्ट २०२३। जळगाव शहरातील चोपडा तालुक्यात आठ वर्षाच्या मुलीशी गैरवर्तन करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ज्ञानेश्वर बन्सीलाल रायसिंग असे आरोपीचे नाव आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यात रहाणारी आठ वर्षीय चिमुकली हि दुपारी घरी असताना संशयित आरोपी ज्ञानेश्वर बन्सीलाल रायसिंग याने चिमुकलीला घरी बोलवून तिच्याशी गैरवर्तन करत अत्याचार केला. हि घडलेली घटना चिमुकलीने आपल्या नातेवाईकांना सांगितली याप्रकरणी मुलीच्या आईवडिलांनी चोपडा शहर पोलिसात तक्रार केली. त्यानुसार संशयित आरोपी ज्ञानेश्वर बन्सीलाल रायसिंग याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment