---Advertisement---

Jalgaon News : खोटे नगरच्या रस्त्याला लागली नाट अपूर्णच राहिली ही मुख्य वाट!

---Advertisement---

जळगाव : आपलं महानगर जळगाव. सुंदर, टुमदार शहर. शहराच्या एका बाजूला तलाव. दुसऱ्या टोकाला विमानतळ. महामार्गाचं हे महानगर काय थोरवी वर्ण मी. मी तर एक रस्ता. ज्याला अर्थशास्त्र कळत नाही. पैसा म्हणजे काय ते समजत नाही. तो का खर्च करतात तेही कळत नाही. अर्थातच माझ्यावर होणारा खर्च किती? तो सत्कारणी लागला की, वाया गेला? याचा ताळमेळ मला लागत नाही. ते काम माणसांचे. अर्थातच तज्ज्ञ लोकांचे. रस्त्यांची वाट का लागते? तेही थोड्याच दिवसात ? हा प्रश्न मलाही पडतो. पण माझे मत कोण विचारत घेईल? मला किंमत ती काय? असो.

तर महानगराचा एक भाग. खोटे नगर. माणसं साधी-सरळ. महिला ममताळू, तरुण उत्साही. उगाच भलत्या भानगडीत न पडणारे. तर या भागातील बस स्टॉप ते तालुका पोलीस स्टेशनच्या रस्त्यावरील खडी, डांबर, त्यावरील आवरण चोरीला गेल्याचा आरोप खोटे नगर परिसरातील नागरिकांनी केला आहे. संताप व्यक्त केला आहे. खोटे नगर बस स्टॉप ते चंदू अण्णा नगर चौक हा वर्दळीचा रस्ता. या रस्त्यावरून नेहमीच अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. यात रेत्वे मालधक्का भागात जाणाऱ्या गाड्या, कचऱ्याच्या गाड्या आदी वाहनांचा सर्रास वापर. साधारण वर्षभरापूर्वी येथे डांबरी रस्ता तयार करण्यात आला. हा रस्ता मध्येच १०० ते २०० फूट खराब झाला आहे… म्हणजे प्रवासाला अनुपयुक्त. वापरण्यास अयोग्य झाला. बरं एवढ्यावरच हे थांबत नाही. तर या खराब रस्त्याच्या शेजारीच भलीमोठी खदान आहे. रस्त्यावरून वाहनचालकांना कसरत करत गाडी चालवावी लागते. या रस्त्यावर तालुका पोलीस स्टेशनदेखील आहे… म्हणून मला म्हणावेसे वाटते, ‘पूछ लेते वो बस मिज़ाज मेरा, कितना आसान था इलाज मेरा।

आम्ही १७ ते १८ वर्षांपासून खोटनगर येथे वास्तव्याला आहोत. खोटे नगर ते चंदू अण्णा नगर चौफुलीचा रस्ता बनवून केवळ एक वर्ष झाले आहे. या रस्त्यावर पूर्ण खड्डे आहेत. यामुळे येथे नेहमी छोटे मोठे अपघात होत असतात. रस्त्याच्या शेजारीच खदान आहे. या खदानीला सपोर्टकरून नवीन रस्ते बनविण्यात यावे. एक सोडून येथे सहा सहा नगरसेवक असून आजपर्यंत या रस्त्यांचे काम पूर्ण झालेले नाही.
-प्रियंका गुजर, रहिवासी

मी मागील २५ वर्षांपासून शिव शक्तत्र कॉलनीत राहण्यास आलो आहे. माझे घर खोटे नगरपासून केवळ ५०० मीटर अंतरावर आहे. हा रस्ता वर्षभरापूर्वी बनिवण्यात आला. या रस्त्याचे आधी खडीकरण करायला हवे होते. या रस्त्याचे खडीकरण केले नाही, तर केवळ मुरुम टाकला, डांबरीकरणाचा लेअर मारून दिल्याने वर्षभरातच रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरून अवजड वाहने जातात. यामुळे रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. हा रस्ता सिमेंटचा करण्यात यावा. जीवराम नगरपासून रस्त्याचे खडीकरण का करण्यात आले नाही हे एक मोठे कोडेच आहे.
-दीपक पाटील , रहिवासी

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment