---Advertisement---

Stock market: दिवसाच्या सुरवातीला घसरलेला बाजार, पुन्हा जबरदस्त तेजीत

by team
---Advertisement---

Stock market: भारतीय शेअर बाजाराची गुरुवारच्या (5 डिसेंबर) ट्रेडिंग सत्रात सकाळी किंचित वाढीसह सुरवात झाली. सेन्सेक्स 120 अंकांच्या वाढीसह 81,000 च्या वर होता. निफ्टी 30 अंकांच्या वाढीसह 24,500 च्या जवळ व्यवहार करत होता. काल बँक निफ्टीत वाढ झाल्यानंतर आज घसरण दिसून आली.

या शेअर्समध्ये घसरण
कामकाजाच्या सुरुवातीला आज आज पॉवरग्रिडचे शेअर्स 0.70 टक्क्यांच्या घसरणीसह उघडले. अदानी पोर्ट्स0.37 टक्के, एनटीपीसी 0.36टक्के, एचडीएफसी बँक 0.25 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 0.20 टक्के, टाटा स्टील 0.14 टक्के, मारुती सुझुकी 0.05 टक्के, लार्सन अँड टुब्रो0.03टक्के आणि नेस्ले इंडिया 0.02 टक्क्यांनी घसरले. तर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.

दिवसाच्या सुरुरवातील किंचित वाढीसह ओपनिंग केल्यावर बाजारात घसरण झाली ज्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत असल्याचं पाहायला मिळाला. पण दुपारी पुन्हा शेअर बाजारात जबरदस्त तेजी दिसून आली.

यांनतर बाजार पुन्हा एकदा तेजीच्या वाटेवर परतला आणि आयटी समभागांसोबतच रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेतही जोरदार खरेदी दिसून आली. दुपारी12 वाजताच्या सुमारास बाजारात अचानक तेजी आली आणि सेन्सेक्सने दिवसभरातील नीचांकी पातळीवरून 1000 अंकांची उसळी घेतली तर, निफ्टीनेही 150 अंकांची उसळी घेत 24648 पातळी गाठली.

झोमॅटो, स्विगी,बीएसई लिमिटेड, CDSL, NSE वरील टॉप गेनर्स ठरले तर आयटी आणि टेलिकॉम वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात ट्रेडिंग करत आहेत. आयटी शेअर्ससह रिलायन्स आणि HDFC बँकेच्या शेअर्समध्येही मजबूत खरेदी होताना दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment