suicide : मुलासाठी विवाहितेला टोकाचे पाऊल उचलायला प्रवृत्त केले

 suicide : दोन मुलींना जन्म दिला. पण मुलगा होत नाही म्हणून सासरच्या मंडळी पल्लवी योगेश पाटील (वय ३५) यांचा छळ केला  जात  होता. नवीन घरासाठी पतीने तगादा लावला होता. ‘तू मेलीस..तर, विम्याची पूर्ण रक्कम मिळेल’, असे म्हणत छळ करून विवाहितेला आत्महत्येस suicide प्रवृत्त केले.

या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेचे वडील गणेश बन्सी चौधरी (रा. बहादरपूर, मध्य प्रदेश) यांनी तक्रार दिली आहे. त्यांची मुलगी पल्लवी हिचा योगेश पाटील यांच्याशी दोन लाखांचा हुंडा आणि दागिने देऊन मानपान करीत २०१२ मध्ये रावेर येथे विवाह करण्यात आला होता. विवाहानंतर पल्लवी यांना दोन मुलगी झाल्या. तेव्हापासून तिचा छळ सुरु झाला.

ती माहेरी येत होती. त्या वेळी तिने मुलगा होत नाही म्हणून सासरचे टोचून बोलतात, टोमणे मारतात, पतीकडून शारीरिक, मानसिक छळासह मारहाण करण्यात येत असल्याचे सांगितले होते. हा त्रास असह्य झाल्याने यापूर्वी ती २०१९ मध्ये माहेरी निघून आली होती. ती दहा महिने माहेरी राहिली.

त्यावेळी समझोता घडवून आणून सासरच्या मंडळींनी तिला घरी नेले. परंतु, त्यानंतरही छळ सुरू होता, असे चौधरी यांनी तक्रारीत म्हटले आहे. १४-१ तो फोन अखेरचा पल्लवीने २१ डिसेंबर २०२३ ला पल्लवी यांनी वडिलांना फोन करून सांगितले की, पती नवीन घर मागत असून तुम्ही नवीन घर घेऊन द्या, नाही तर सासरचे लोक जिवंत ठेवणार नाहीत.

अखेर २४ डिसेंबरला सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून पल्लवीने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. चौधरी यांच्या तक्रारीनुसार बुधवारी (ता. ३) पती योगेश पाटील, सासरे प्रेमचंद पाटील, सासू इंदूबाई पाटील, जेठ देवानंद पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.