यावल : तालुक्यातील एका विवाहितेने मंगळवारी राहत्या घरात गळफास घेत जीवन यात्रा संपवल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. योगीता निलेश चौधरी (२७) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
यावल तालुक्यातील कोळवद गावातील विवाहित योगीता निलेश चौधरी यांनी मंगळवारी राहत्या घरात आत्महत्या केली. कुटुंबीयांना घटनेची माहिती कळताच त्यांनी तातडीने तिला यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून मृत घोषीत केले. विवाहितेने आत्महत्या का केली ? याचे कारण कळू शकले नाही. विवाहितेच्या पश्चात पती, चार वर्षीय मुलगी व दिड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
याप्रकरणी यावल पोलिसात डिगंबर चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार उमेश सानप, राजेंद्र पवार, मोहन तायडे करीत आहे.