सोमवारी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या सूत्रधाराचे नाव उघडकीस आले आहे. नागपूरमधील तणावाबाबत पोलिसांनी 51 लोकांवर एफआयआर नोंदवला आहे. या मध्ये मुख्य सूत्रधारचे नाव समोर आले आहे.
औरंगजेबाच्या कबरीच्या वादाने सोमवारी हिंसक वळण घेतले.नागपूरमधील महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांमधील वादानंतर हिंसाचार उसळला. अज्ञात लोकांनी दुकानांची तोडफोड केली आणि वाहने जाळली. यादरम्यान जोरदार दगडफेक झाली. हिंसाचारानंतर अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली.
नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागातील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गरज नसताना या भागातील लोकांनी घराबाहेर निघू नये, तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी जमू नये, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
पोलिसांनी नोंदविल्या एफआयआरनुसार फहीम शमीम खानने जमाव जमवल्याची माहिती समोर आली आहे .फहीम खान मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे.
फहीम खान 38 वर्षांचा असून मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे. फहीम खानने हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त करत होता.फहीम खान याने लोकांना भडकवण्याचे काम केले. त्यानंतर ही हिंसा घडली. नागपूरमधील गणेशपेठ पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या दुसऱ्या तक्रारीमध्ये उघड झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणूक फहीम खानने निवडणूक देखील लढवली होती. मात्र त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.
