राष्ट्रवादी अजित पवार पक्षात ईच्छुकांची भाऊगर्दी,स्वबळावर लढण्याची तयारी,109 जणांच्या मुलाखती

---Advertisement---

 

जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युतीची चर्चा होत असली तरी राज्यातील सत्ताधारी तिसऱ्या मित्र पक्षाने अर्थात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्वबळाची तयारी केली जात आहे. बुधवारी 24 डिसेंबर रोजी पक्ष कार्यालयात मुलाखतींसाठी ईच्छुकांची मोठी भाऊगर्दी दिसून आली.

राज्यात नुकतेच नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकाचे यश मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे महापालिका निवडणुकांमध्ये देखील राष्ट्रवादी ताकद अजमावण्याच्या तयारीत आहे. राज्यासह जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेनेच्या युतीच्या चर्चा होत आहे. या युतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्थान नसल्याचे दिसत असल्याने पक्षाने महापालिकेच्या जागा ह्या स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.

ईच्छुकांच्या मुलाखतींना गर्दी

महापालिका निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गट पक्षाच्या मुलाखतींचा पहिला टप्पा पार पडला आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मुलाखती बुधवारी 24 डिसेंबर रोजी पक्षकार्यालयात घेण्यात आल्या. या मुलाखतींसाठी ईच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. शहरी भागात राष्ट्रवादीचा मतदार असल्याने ईच्छुकांच्या प्रभागनिहाय मुलाखती घेण्यात आल्या. यात 109 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

यांनी घेतल्या मुलाखती

ईच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी माजी मंत्री अनिल पाटील, गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महिला महानगर प्रमुख मीनल पाटील, कल्पना पाटील, योगेश देसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---