नवी दिल्ली : ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे अध्यक्ष बदरुद्दीन अजमल यांनी नवीन झालेल्या संसदेच्या इमारतीबाबत मोठा दावा केला आहे. संसदेची नवी इमारत वक्फ जमिनीवर बांधली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जम्मू-काश्मीर वक्फ बोर्डाचे सदस्य सोहेल कासीम यांनी गुरुवारी बदरुद्दीन अजमल यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
जम्मू काश्मीर वक्फ बोर्डाचे सदस्य सोहेल कासमी म्हणाले की, वक्फ बोर्डचे व्यवस्थापन करणे यावर केवळ वक्फ बोर्डाचे कर्तव्य आहे. केवळ जम्मू-काश्मीरच नाहीतर देशभरात वक्फ आपली मालमत्ता हलवत असल्याचे कासमी म्हणाले आहेत.
आसाम येथील धुबरी येथील माजी खासदार आणि ऑल इंजिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे अध्यक्ष बदरुद्दीन अजमल यांनी मंगळवारी हे वक्तव्य केले होते. यावेळी त्यांनी संसदेची नवी इमारत वक्फ जमिनीवर बांधल्याचा दावा केला. अजमल यांनी आरोप केला आहे. यावेळी ते म्हणाले की, सरकार आणि अदानी यांना वक्फची जमीन दिल्याने त्यांनी त्याठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधण्याचे काम केले.
त्यांनी वक्फ दुरूस्ती विधेयकाला विरोध करत आपला लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले. माजी खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी केलेली ही टिप्पणी म्हणजे बेजबाबदार विधान आहे, असे ते म्हणाले. सोहेल कासमी म्हणाले की, वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन करणे हे वक्फ बोर्डाचे कर्तव्य आहे असे ते म्हणाले.