---Advertisement---
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवत आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर महायुतीकडील अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजपाकडून १३ अ मधून नितीन प्रभाकर सपके, १३ ब मधून सौ. सुरेखा नितीन तायडे हे उमेदवार रिंगणात असून १३ क मधून सौ. वैशाली अमित पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून १३ ड मधून प्रफुल्ल गुलाबराव देवकर हे अधिकृत उमेदवार आहेत.
दरम्यान, भाजपामधील काही इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आपली उमेदवारी कायम ठेवली असून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. हे उमेदवार जणू भाजपाचेच अधिकृत उमेदवार असल्याप्रमाणे प्रचार करत असल्याचे चित्र प्रभागात दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीपत्रकाद्वारे मतदारांना स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रभाग क्रमांक १३ मधील अ, ब आणि ड गटांतील कमळ व घड्याळ चिन्हावरील उमेदवार हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. बंडखोर उमेदवारांनी येत्या दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट न केल्यास त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
प्रभागातील सर्व सुजाण मतदारांनी कोणत्याही अफवांना किंवा दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी न पडता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदारांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









