खुला भूखंड झाला गहाळ ; आयुक्तांनी शोधून दिल्यास १ हजार १ रुपयांचे केले बक्षीस जाहीर

जळगाव : शहरातील आदर्श नगरातील एका नागरिकाने मेहरूण शिवारातून चक्क खुला भूखंड गहाळ झाल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडे केली आहे. या नागरिकाने खुला भूखंड शोधून देणाऱ्यास एक हजार एक रुपयांचे बक्षीला जाहीर केले आहे.

नागरिक पृथ्वीराज सोनवणे यांनी आयुक्तांना दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, मी आदर्श नगर मधील रहीवासी आहे माझा रहीवास मेहरूण शिवार गट नं. ४३६/१अ या ठिकाणी प्लॉट नं. ७८ मध्ये राहतो. पण या ठिकाणी मला कोठेही खुला भुखंड दिसत नाही. या ठिकाणी शेकडो कुटुंब राहतात. लहान मुले, आबाल वृद्ध आणि वयोवृद्ध लोक राहतात. पण त्यांना फिरण्यासाठी खेळण्यासाठी जागा दिसत नाही. त्यामुळे आम्हाला रोडावर फिरावे लागते, खेळावे लागते. त्यामुळे अपघात होण्याची संभावना खुप वाढलेली आहे. महाशय आपण मला माझा खुला भुखंड कुठे गहाळ ( हरवला ) आहे तो आपण सापडून द्यावा, ही विनंती. जर महाशय तुम्ही जर मला माझा खुला भुखंड जर शोधून दिला तर मी आपण आणि आपल्या प्रशासनास रू. १००१/- (रूपये एक हजार एक मात्र ) बक्षीस देईन.